पहिल्या वर्षी जिओ फोन रिफंड केल्यासही मिळेल रिफंड
रिलायन्सचा नवा ४जी `जिओ`फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
मुंबई : रिलायन्सचा नवा ४जी 'जिओ'फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
या नव्या फोनबद्दल रोजच नवनवे अपडेट्स मिळत आहेत. आता ग्राहक पहिल्याच वर्षात जिओ फोन परत करून त्याबदल्यात काही स्वरूपात रिफंड मिळवू शकतात अशी महिती देण्यात आली आहे.
जिओच्या एका चॅनल पार्टनरने दिलेल्या माहितीनुसार, जे ग्राहक विविध प्लॅन्सचा वापर करून वर्षभरात किमान १५०० रूपयांचा रिचार्ज करेल अशा ग्राहकांना पहिल्या वर्षात रिफंड केल्यास ५०० रूपये रिफंड मिळणार आहेत.
जिओफोन दुसर्या वर्षी रिफंड केल्यास १०००रूपये आणि तिसर्या वर्षी रिफंड केल्यास १५०० रूपये मिळणार आहेत.
रिलायंस जिओफोनमध्ये ४जी ची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे केवळ १५०० रूपयांच्या डिपॉजिट वर ४जी सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांमध्ये या फोनविषयी विशेष आकर्षण आहे. तसेच यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांमध्येही चढाओढ सुरू झाली आहे.