मुंबई : ग्राहकांमध्ये अल्पावधीमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण करणारा रिलायन्स  जिओ ४जी फीचर फोनची निर्मिती थांबवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स जिओला एअरटेल आणि व्होडाफोनकडून तीव्र स्पर्धा आहे. रिलायन्स पाठोपाठ व्होडाफोनने ९९९ रूपयांमध्ये तर एअरटेलने १३९९ रूपयांमध्ये स्मार्टफोन उपलब्ध करून दिला आहे.  
फॅक्टर डेलीच्या रिपोर्टनुसार, जिओ ४जी फीचर फोन बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी आता नव्या, स्वस्त आणि स्पेशल ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करणार्‍या फोन निर्मितीकडे लक्ष देण्यात येणार आहे. 


नव्या फोनसाठी जियो गूगलची मदत घेण्याचा विचार करत आहे. या दोघांमध्ये यशस्वी बोलणी झाल्यास ग्राहकांना नवा फोन मिळण्याची शक्यता आहे. 


 जिओ ४जी फीचर फोन Kia ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत आहे. सुमारे १ कोटी फोन या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बनवले आहेत. पण यापुढे याची निर्मिती होणार की नाही ? ते फोन बाजारात येणार की नाही ? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 


व्होडाफोनने मायक्रोमॅक्स सोबत येऊन  Micromax Bharat 2 Ultra स्मार्टफोन लॉन्च केला आहे. तर एअरटेलने Celkon सोबत करार करून नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.