मुंबई : रिलायन्स जिओने अखेर त्यांच्या जिओ फोनसाठीच्या नियम आणि अटींवरून पडदा उठवला आहे. जेव्हापासून फोन आणि त्याच्या किंमतीची घोषणा झाली, तेव्हापासून कंपनी यावर काय अटी लावणार याचे वेगवेगळे अंदाज बांधणे सुरू होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्यांदाच कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर हे नियम आणि अटी सांगितल्या आहेत. चला जाणून घेऊया त्या नियम आणि अटी.


वर्षाला १५०० रूपयांचे रिचार्ज


रिलायन्स जिओच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या नियम आणि अटींनुसार यूजर्सना प्रत्येक वर्षी कमीत कमी १५०० रूपयांचं रिचार्ज करणे गरजेचे असेल. 


जिओफोन सीम लॉक्ड असणार


जिओफोनमध्ये जिओ सिम कार्ड आधीपासूनच लावलेलं असेल आणि ते लॉक्ड असेल. म्हणजे त्या फोनमध्ये यूजर्स दुस-या कोणत्याही नेटवर्क प्रोव्हायडर कंपनीचं सिम कार्ड वापरू शकणार नाहीत. 


ना कुणाला देऊ शकणार ना विकू शकणार


कंपनीच्या वेबसाईटवर स्पष्ट लिहिले आहे की, हा फोन ग्राहक कुणालाही विकू शकणार नाहीत. तसेच कुणाला उधारही देऊ शकणार नाहीत. 


१२ महिन्यांपूर्वी फोन परत केल्यास?


जिओफोन यूजरला जर १२ महीन्यांपूर्वीच हा फोन परत करायचा असेल तर, त्यांना १५०० रूपये, जीएसटी आणि इतरही कर चुकवावे लागतील. 


कंपनीकडे फोन परत घेण्याचा अधिकार


नियमांचं आणि अटींचं उल्लंघन झाल्यास जिओफोन ग्राहकांकडून परत घेण्याचा अधिकार कंपनीकडे असेल. 


...तर काहीच नाही मिळणार


फोन परत करण्याच्या अटींमध्ये कंपनीने लिहिले आहे की, फोनला ३ वर्ष झाल्यानंतर ग्राहकांना ३ महिन्यांचा कालावधी दिला जाईल. जर या वेळात त्यांनी कंपनीला फोन परत केला नाही तर त्यांना काहीच मिळणार नाही. फोन खरेदी केल्यानंतर ३६व्या आणि ३९व्या महिन्यांच्या आतच फोन कंपनीला परत केल्यास ग्राहकांना १५०० रुपये परत मिळतील.