मुंबई : जर तुम्ही जिओ नंबर वापरत असाल, तर तुम्हाला करोडपती होण्याची संधी आहे. एवढंच नाही तर घरी बसून तुम्ही जिओ नंबरच्या मदतीने लाखो रूपयांचं बक्षिस देखील जिंकू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनी टीव्हीवर कौन बनेगा करोडपतिचं दहावं सत्र सुरू आहे, KBC 10. सोमवारपासून हा शो सुरू होत आहे. केबीसीच्या दहाव्या सिझनमध्ये जिओ युझर्सना बक्षिस जिंकण्याची खास संधी आहे. जर तुमच्याकडे जिओचा नंबर असेल, तर तुम्ही घरात बसून लाखो रूपये कमवू शकतात.


जिओ युझर्सला बक्षिस जिंकण्यासाठी जिओ केबीसी वर एलॉग (Jio KBC Pay Along) खेळावं लागेल. हा खेळ खेळल्यानंतर तुम्ही लाखोंचं बक्षिस जिंकू शकतात. केबीसीच्या नवव्या सिझनच्या कार्यक्रमादरम्यान आपण मोबाईलवर Jiochat App च्या माध्यमातून उत्तर देऊन, बक्षिस जिंकण्यासाठी हॉटसीटपर्यंत पोहचू शकतो. एवढंच नाही, हॉटसीटवरील प्रश्नांचं उत्तर देऊन, तुम्ही करोडपति होवू शकतात.


असं खेळतात Jio KBC Pay Along


सर्वात आधी गूगल प्ले स्टोरमध्ये जाऊन तुम्हाला जिओ चॅटअॅप Jiochat App डाऊनलोड करावं लागेल.


अॅप डाऊनलोड झाल्यानंतर, यात नाव, जन्मतिथी आणि फोटो देऊन आपलं रजिस्ट्रेशन करा.


असं केल्यानंतर तुम्ही प्रश्नांचं उत्तर देऊ शकता. या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला लाईव्ह प्रोग्राम दरम्यान द्यायची आहेत.


तुमची उत्तरं बरोबर आहेत, हे पाहून युझर्सला येथे गुण दिले जातात. या गुणांच्या आधारावर तुम्हाला हॉटसीटवर येण्याचं आमंत्रण दिलं जाईल.


जिओ घर बैठे जितो जॅकपॉटसोबत ३० लाख युझर्स खेळू शकतात.


कौन बनेगा करोड़पति, kbc 10, kbc, Jio KBC Pay Along, KBC Pay Along, Jiochat App


कौन बनेगा करोडपति सीझन १० च्या रजिस्ट्रेशनची सुरूवात ६ जून सायंकाळी ८.३० वाजता सुरू झाली आहे. एसएमएस, कॉल, केबीसी मोबाईल, अॅप, ऑनलाईन आणि आयव्हीआरचा वापर करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ऑनलाईन नोंदणीसाठी तुम्हाला या https://kbcliv.in/online-registration/ वेबसाईटवर जावं लागेल. रजिस्ट्रर्ड यूझरला ई-मेल आणि एसएसएसच्या माध्यमातून आगामी शोच्या तारखांबद्दल माहिती देण्यात येईल.


आपल्याकडे जिओचं कार्ड नसेल, तर तुम्ही SMS, कॉल, KBC मोबाईल अॅप किंवा वेबसाईटच्या IVR वर आणि सोनी लाईव्ह अॅपवरही शो दरम्यान लाईव्ह खेळून बक्षिस जिंकता येणार आहे.