jio launching 5G service in india: भारतात 5G सेवा सुरु होणार याची बऱ्याच काळापासून चर्चा होती मात्र कधी सुरु होणार याची सर्वच युझर्स प्रतीक्षा करत होते अखेर तो दिवस उजाडलाच .. खरतर पुढील वर्षी भारतात 5G सुरु होईल अशा चर्चा होत्या पण आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे . Jio  न नुकतीच मोठी घोषणा करून भारतात 5G सेवा कधी सुरु केली जाईल हे सांगितलं आहे त्यामुळे भारतात 5G सेवा सेउरु होण्याला अखेर मुहूर्त मिळाला असं म्हणायला हरकत नाही ,Jio लवकरच भारतात 5G सेवा लॉन्च करणार आहे:  भारतातील सर्वात लोकप्रिय नेटवर्क अर्थात जिओने आता आपली 5G सेवा बाजारात आणण्‍याची घोषणा केलीये विशेषम्हणजे ज्या दिवशी ही सेवा बाजारात आणली जात आहे तो दिवस संपूर्ण भारतासाठी खूप खास आहे आणि या दिवशी 5G सेवा सुरू करून कंपनी भारतीय ग्राहकांना एक खास भेट देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी भारतात 5G सेवा  लॉन्च होणार आहे, हा दिवस भारतीयांसाठी खूप खास आहे, यावर्षी आपला देश 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करतोय आणि हाच मुहूर्त साधत भारतीयांसाठी जिओ कडून ही भेट असेल असं आपण म्हणू शकतो . कंपनी भारतीय ग्राहकांसाठी 5G सेवा सुरू करणार आहे.ही सेवा 5G स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांना नेक्स्ट लेव्हल अनुभव देईल, मग तो इंटरनेटचा स्पीड असो कि किंवा कॉलिंग, दोन्हीही पूर्वीपेक्षा अधिक चांगले असतील आणि ग्राहकांना असा अनुभव मिळेल जो त्यांना यापूर्वी कधीही मिळाला नव्हता.


एअरटेलसोबत तगडा मुकाबला


एअरटेलनेही जिओला टक्कर देण्याची तयारी पूर्ण केलीये. एअरटेलने ऑगस्टच्या अखेरीस 5G सेवा सुरू करण्याबाबतही संकेत दिले आहेत. 


5G सेवा देणार या सुविधा


5G सेवा सुरू केल्यामुळे, ग्राहकांना कोणत्याही डिस्टर्ब्न्सशिवाय  सुपरफास्ट इंटरनेट स्पीड पाहण्यास मिळेल, जो पूर्वीपेक्षा अधिक चांगला अनुभव देईल  त्यामुळे शिक्षण, कृषी, आरोग्य या क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे.