नवी दिल्ली : रिलायन्स जिओने टेलिकॉम इंडस्ट्रीत धमाका केल्यानंतर आता रिलायन्स आणखी एक धमाका करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओ आपल्या ग्राहकांना फ्रि शॉपिंग करवण्याची तयारी करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील वाढत्या डिजिटल पेमेंटला बघता जिओ आता ई-कॉमर्स मार्केटमध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. यामाध्यमातून जिओ लोकप्रिय अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांना टक्कर देणार आहे.


जिओ मनीतून सुविधा देण्याची तयारी


कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओ कॉर्नर स्टोर, किराणा दुकाने आणि कंज्यूमर ब्रॅण्डससोबत संपर्कात आहे. जिओ कंपनीचे ग्राहक जिओ मनी प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. डिजिटल कूपनच्या माध्यमातून शेजारच्या दुकानातून खरेदी केली जात आहे. सध्या जिओ मुंबई, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये ई-बिझनेस सुरू करत आहे. येत्या काही दिवसात ही सेवा इतरही शहरांमध्ये सुरू होईल. 


ई-कॉमर्स कंपन्यांची जिओवर नजर


गेल्या एका वर्षात जिओसोबत १३.२ कोटी ग्राहक जोडले गेले आहेत. यात त्यांचं प्लॅटफॉर्म अजिओचा सुद्धा समावेश आहे. कंपनी आता ऑनलाई टू ऑनलाईन ई-कॉमर्समध्ये प्रवेश केलेल्या पेटीएम आणि फोनपे सारख्या कंपन्याकडे लक्ष देत आहे. पेटीएमसारखी कंपनी कॉर्न स्टोर आणि इतर ब्रॅन्डसोबत मिळून बिझनेस करत आहे. यांना नेटवर्कचं आक्रामक रूप बदलण्यासाठी गुंतवणूकदारांची मदत मिळते. तेच अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सुद्धाअ किराणा सामानाचा डिलेव्हरी बिझनेस सुरू करत आहे. 


अंतिम रूप देणे सुरू


सूत्रांनुसार, आतापर्यंत जिओने ई-कॉमर्स बिझनेस मॉडेलला अंतिम रूप दिलेलं नाहीये. दुस-या शहरांमधील रिसर्चनंतर यात बदल केले जातील. जिओने पायलट प्रोजेक्टसाठी आयटीसी, विप्रो, डाबर, टाटा बेवरेजेज, गोदरेज कन्जूमर आणि अमूल यासारखे ब्रॅन्डचा समावेश आहे. 


काय मिळणार सुविधा?


सध्या जिओ आपल्या मोबाईल ग्राहकांना विशेष ब्रॅन्डच्या प्रॉडक्टसाठी डिजिटल कूपन देतील. यूजर्स या डिजिटल कूपनच्या माध्यमातून या ब्रॅन्डवर शॉपिंग करू शकतील. शेजारच्या कोणत्याही स्टोरमध्ये हे कूपन घेतले जातील. ज्या स्टोरसोबत पार्टनरशिप झाली असेल त्याच ठिकाणी हे कूपन चालतील. ब्रॅन्ड पार्टनर आपल्या प्रॉडक्ट्सचे प्रमोशन ऑफर्स जिओ ग्राहकांना पाठवू शकतील.