WhappAppवरुन शॉपिंगची सुविधा
ग्राहक आपली ऑर्डर जवळच्या किराणा स्टोरमधून कलेक्ट करु शकतात
नवी दिल्ली : लॉकाडऊनमुळे सर्वच जण घरी आहेत. आता मोबाईल फोनमध्ये व्हॉट्सअपवर शॉपिंगची सुविधा सुरु होत आहे. Reliance Jioने JioMart ची सुविधा व्हॉट्सअपवर उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे.
व्हॉट्सअपवरुन शॉपिंगसाठी -
- JioMartचा व्हॉट्सअप नंबर 88500 08000 आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करावा लागेल.
- नंबर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअप कॉन्टॅक्टमध्ये या नंबरवर 'Hi' मेसेज पाठवावा लागेल.
- त्यानंतर जिओमार्ट, व्हॉट्सअप नंबर सेव्ह करणाऱ्या ग्राहकाच्या चॅट विंडोमध्ये एक लिंक पाठवेल. ही लिंक केवळ 30 मिनिटांपर्यंत ऍक्टिव्ह राहील.
- या लिंकवर क्लिक केल्यानंतर यूजरला एक नवं पेज ओपन करावं लागेल ज्यामध्ये यूजरला आपला पत्ता आणि फोन नंबर असे काही डिटेल्स भरावे लागतील.
- आवश्यक डिटेल्स भरुन झाल्यानंतर जिओमार्ट ग्राहकाला त्याच्या व्हॉट्सअपवर त्यांच्याकडे असलेल्या वस्तूंची यादी पाठवेल.
- ग्राहकाला त्या सामानाच्या यादीतून हवं ते सामान निवडून ऑर्डर पाठवावी लागेल.
- त्यानंतर ग्राहकाची ऑर्डर आणि त्याचे डिटेल्स जिओ मार्ट किंवा आसपासच्या किराणा स्टोरमध्ये पाठवण्यात येतील.
- ग्राहक आपली ऑर्डर जवळच्या किराणा स्टोरमधून कलेक्ट करु शकतात
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअपवरील शॉपिंगची सुविधा केवळ नवी मुंबईतील काही विभाग, ठाणे, कल्याणमध्ये लाईव्ह करण्यात आली आहे. परंतु लवकरच इतर भागातही सुरु होण्याबाबत सांगण्यात येत आहे.