सिंगल चार्जमध्ये मुंबईहून थेट कोकण गाठा, जबरदस्त 6-सीटर इलेक्ट्रिक SUV लाँच, किंमत फक्त...
Kia EV9 ला कंपनीने गतवर्षी ऑटो एक्स्पोमध्ये कन्सेप्ट कार म्हणून सादर केलं होतं. आता कंपनीने अधिकृतपणे या एसयुव्हीला भारतीय बाजारात विक्रीसाठी लाँच केलं आहे.
Kia EV9 Price and Features: किया इंडियाने आपल्या दोन कार लाँच केल्या आहेत. एकीकडे कंपनीने आपली प्रसिद्ध एमपीव्ही Kia Carnival च्या फोर्थ-जनरेशन मॉडेलला लाँच केलं आहे, तर दुसरीकडे कंपनीने आपली नवी इलेक्ट्रिक एसयुव्ही Kia EV9 ला अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केलं आहे. Kia EV9 ला कंपनीने गतवर्षी ऑटो एक्स्पोमध्ये कन्सेप्ट कार म्हणून सादर केलं होतं.
नवी Kia EV9 ला कंपनीने फुली-लोडेड ट्रीमच्या जीटी-लाइन ट्रीमला लाँच केलं आहे. आकर्षक लूक आणि दमदार बॅटरी असणाऱ्या या कारची किंमत 1.3 कोटींपासून (एक्स-शोरुम) सुरु होते. कंपनी या एसयुव्हीला कम्प्लिट बिल्ट युनिट (Complete Built Unit) मार्गे भारतात आणत आहे. यामुळेच या कारची किंमत जास्त आहे.
कशी आहे Kia EV9
आकाराबद्दल बोलायचे झाल्यास, या SUV ची लांबी 5,015 मिमी, रुंदी 1,980 मिमी, उंची 1,780 मिमी आहे आणि तिचा व्हीलबेस 3,100 मिमी आहे. Kia EV9 चे लूक आणि डिझाईन खूपच चांगले आहे. यात L-आकाराचे DRL सह वर्टिकल स्टैक्ड LED हेडलॅम्प आणि इंटिग्रेटेड डिजिटल-पॅटर्न लाइटिंगसह क्लोज्ड-ऑफ ग्रिल दिलं आहे. याला उभ्या एलईडी टेल-लॅम्पसह टेलगेट, स्पॉयलर आणि स्किड प्लेटसह ड्युअल-टोन बंपर मिळतो.
Kia EV9 मानक 6-सीटर लेआउटसह सादर केले गेलं आहे. दुसऱ्या रांगेत कॅप्टनची जागा देण्यात आली आहे. यात ड्युअल स्क्रीन डिस्प्ले आहे. ज्यामध्ये 12.3-इंच टचस्क्रीन आणि तत्सम डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. यात 4-स्पोक स्टीयरिंग व्हील आहे, मध्यभागी कन्सोलच्या खाली स्टोरेज स्पेस आणि मध्यभागी एसी व्हेंटच्या अगदी खाली फिजिकल कंट्रोल देण्यात आली आहेत. Kia ड्युअल-टोन ब्राऊन आणि ब्लॅक इंटीरियर कलरवेसह EV9 ऑफर करत आहे.
बॅटरी पॅक आणि रेंज
या इलेक्ट्रिक SUV मध्ये कंपनीने 99.8kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. जे ड्युअल इलेक्ट्रिक मोटरला जोडलेले आहे. या दोन्ही मोटर्स मिळून 384hp पॉवर आणि 700Nm टॉर्क जनरेट करतात. कंपनीचा दावा आहे की ही SUV एका चार्जमध्ये 561 किमी अंतर कापू शकते.
ही इलेक्ट्रिक एसयूव्ही पॉवर जनरेशनमध्ये उत्कृष्ट आहे. कंपनीचे म्हणणे आहे की Kia EV9 फक्त 5.3 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग वाढवण्यास सक्षम आहे. त्याची बॅटरी 350kW DC फास्ट चार्जरच्या मदतीने अवघ्या 24 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते.
फिचर्स काय आहेत?
Kia EV9 मध्ये इलेक्ट्रिक ॲडजस्टमेंट, मसाज फंक्शन आणि ॲडजस्टेबल लेग सपोर्ट सारखी वैशिष्ट्ये आहेत. इतर वैशिष्ट्यांमध्ये थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, ड्युअल-इलेक्ट्रिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, डिजिटल इनसाइड रीअर-व्ह्यू मिरर, 14-स्पीकर मेरिडियन ऑडिओ सिस्टम, OTA अपडेट, Kia कनेक्ट कनेक्ट- कार तंत्रज्ञान असे फिचर्स आहेत.