Kia Sonet Aurochs Edition: ऑटोमोबाइल क्षेत्रात सध्या मोठ्या घडामोडी सुरु असून अनेक कंपन्या नव्या गाड्या बाजारात आणत आहेत. एकीकडे बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांचा दबदबा निर्माण झालेला असताना दुसरीकडे जबरदस्त फिचर्ससह SUV देखील दाखल होत आहेत. नुकतंच Kia India ने आपली प्रसिद्ध कॉम्पॅक्ट एसयुव्ही Kia Sonet च्या नव्या Aurochs एडिशनचं लाँचिंग केलं आहे. आपल्या आकर्षक लूक आणि दमदार इंजिनमुळे ही कार लक्ष वेधून घेतलं आहे. ही एसयुव्ही Kia Sonet च्या स्पेशल एडिशन HTX व्हेरियंटवर आधारित आहे. कंपनीने या कारमध्ये काही बदल केले आहेत, ज्यामुळे ती आकर्षक ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Sonet Aurochs एडिशनला कंपनीने चार रंगात आणलं आहे. यामध्ये ग्रेविटी ग्रे, ऑरोरा ब्लॅक पर्ल, स्पार्कलिंग सिल्वर आणि ग्लेशियर व्हाइट पर्ल या रंगांचा समावेश आहे. यामध्ये फ्रंट आणि रियर स्किड प्लेट्स, सेंटर व्हील कॅप्स, ग्रिल, डोर गार्निश आणि साइड स्किड प्लेट्सवर टेंजरील एक्सेंट देण्यात आलं आहे. याशिवाय 16 इंचाचा डायमंड कट अलॉय व्हील, LED हेडलँप देण्यात आला आहे. 


Kia Sonet Aurochs चे व्हेरियंट्स आणि किंमती किती?


Kia Sonet Aurochs एकूण चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यामधील पेट्रोल व्हेरियंट 11 लाख 85 हजार आणि 12 लाख 39 हजारात उपलब्ध आहे. तर डिझेल व्हेरियंट 12 लाख 65 हजार आणि 13 लाख 45 हजारात आहे. 


कंपनीने पेट्रोल आणि डिझेल अशा दोन पर्यायात ही कार आणली आहे. यामध्ये 1.0 लीटरच्या टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर क्षमतेचं डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 6-स्पीड टार्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गेअरबॉक्ससह येतं. यामध्ये 7-स्पीड डुअल क्लच ट्रान्समिशनचा पर्यायही मिळतो. या कारचं पेट्रोल इंजिन 118bhp ची पॉवर आणि डिझेल इंजिन 114bhp ची पॉवर जनरेट करतं. 


फिचर्स काय?


Kia Sonet ने या स्पेशल एडिशनमध्ये 8 इंचाचा टचस्क्रीन इंफोमेंट सिस्टम दिलं आहे. जो अॅप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करतं. याशिवाय 4 एअरबॅग, इलेक्ट्रिक सनरुफ, फ्लॅट बॉटम स्टेअरिंग व्हील. हाइड एजडस्टेबल ड्रायव्हिंग सीट आणि रिमोट इंजिन स्टार्ट फंक्शन, क्रूज कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मागील सीटवरील प्रवाशांसाठ रियर AC वेंट्स, ड्राइव्ह आणि ट्रॅक्शन मोड मिळतात.