मुंबई : तुम्ही रस्त्याने चालत आहात आणि कुत्र्यांच्या झुंडीने तुम्हाला घेरले तर... केवळ हा विचार मनात आला तरी तुमची भंबेरी उडते. मात्र, चक्क चिमुकल्या बालकाला चार ते पाच कुत्र्यांनी घेरले असताना त्यांने साहस दाखवून त्यांना पिटाळून लावले आणि स्वत:चा जीव वाचवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक चिमुकला आणि चिमुकली रस्त्याने हाथ धरुन चालली होती. यावेळी कुत्र्यांचा जमाव त्यांच्या अंगावर धाऊन आला. भितीने चिमुकलीने हात सोडून आपला जीव वाचवला. मात्र, चिमुकल्याला कुत्र्यांनी घेरले. बालक क्षणभर घाबरला. हिम्मत करुन त्यांने कुत्र्यांना फळवून लावले.