Kinetic Luna Launching: कायनेटिक ग्रीन (Kinetic Green) आपली प्रसिद्ध मोपेड ई-लुना (E Luna) आज लाँच करणार आहे. कंपनीने 26 जानेवारीलाच या गाडीची बुकिंग सुरु केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक मोपेडची ऑनलाइन-ई प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरुनही विक्री करणार आहे. आतापर्यंत कंपनीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीवर पहिल्याच दिवशी बुकिंग बंद करण्याची वेळ आली होती. कंपनीने 500 रुपयांच्या टोकन अमाऊंटमध्ये हिची बुकिंग सुरु केली होती. 


ई-लूनाचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या ही लूना ओसन ब्ल्यू या एकाच रंगात उपलब्ध आहे. कंपनीने यामध्ये 2kWh च्या लिथिअम आयर्न बॅटरीचा वापर केला आहे. मोटार 2 व्हॅट टाइप आहे. ही गाडी सिंगल चार्जमध्ये 110 किमीची रेंज देते. हिचा टॉप स्पीड ताशी 50 किमीपर्यंत असणार आहे. कंपनी यासह एक पोर्टेबल चार्जर देईल. ही इलेक्ट्रिक मोपेड 4 तासात फूल चार्ज होईल. कंपनीने यामध्ये ट्यूब टायरचा वापर केला आहे. 


फिचर्स काय?


सध्या तरी या मोपेडमध्ये बदलू शकणारी बॅटरी मिळणार आहे की नाही याबाबत काही माहिती मिळालेली नाही, दरम्यान ही इलेक्ट्रिक मोपेड 22NM चा टॉर्क जनरेट करते. याच्या कंसोलमध्ये स्पीड, ओडोमीटर, ट्रिप मीटर, बॅटरी एसओसी, डीटीई, डायरेक्शन इंडिकेटर, हाय बीम इंडिकेटर अशसे फिचर्स मिळतील. यामध्ये टेल आणि टर्नसाठी फिलमेंट मिळेल. सुरक्षेसाठी यामध्ये कॉम्बी ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. यामध्ये फ्रंटला टेलिस्कॉपिक आणि बॅकला ड्युअलशॉक सस्पेंशन देण्यात आलं आहे. 


ई-लूनाची लांबी 1.985 मीटर, लांबी 0.735 मीटर, उंची 1.036 मीटर आणि व्हीलबेस 1335 मिमी आहे. या मोपेडच्या सीटची उंची 760 मिमी आणि कर्ब वेट 96 किलो आहे. या इलेक्ट्रिक मोपेडचं एकूण वजन 96 किलो आहे. तर ग्राऊंड क्लिअरन्स 170 मिमी आहे. 


किंमत किती?


या इलेक्ट्रिक मोपेडची सुरुवातीची किंमत 71 हजार 990 रुपये आहेत. ग्राहक 2500 रुपयांच्या मासिक हफ्त्यावर ही मोपेड खरेदी करु शकतात. सुरुवातीला 50 हजार ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. 


दर महिन्याला 500 युनिटचं प्रोडक्शन होणार


इलेक्ट्रिक लूना किंवा ई-लूना कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सॉल्यूशन्सचं प्रोडक्ट असणार आहे. हा कायनेटिक ग्रुपचा सहकारी ब्रँड आहे. कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सॉल्यूशन्स अहमदनगरमध्ये लूनाचं प्रोडक्शन करणार आहे. सुरुवातीला महिन्याला 5000 युनिट्सचं प्रोडक्शन केलं जाणार आहे. मागणीप्रमाणे याचं प्रोडक्शन वाढवलं जाणार आहे.