नवी दिल्ली : लोकांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये काय सर्च केलं, सर्च इंजिनमध्ये त्यांनी काय सर्च केलं आणि कोणत्या फोल्डरमध्ये त्यांनी काय लपवलंय. फोन किती वापरला गेलाय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला माहितीये का ही माहिती कशी मिळवायची. काय कधी तुम्ही याचा सिक्रेट कोड ट्राय केलाय? काय तुम्हाला हे जाणून घ्यायचंय की, तुमच्या अनुपस्थितीत तुमचा फोन कुणी कशासाठी वापरला. तर ते शक्य आहे. 


काय आहे तो कोड?


स्मार्टफोनची माहिती मिळवण्यासाठी *#*#4636#*#* हा कोड वापरला जातो. हा कोड कोणत्याही अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोनवर वापरला जाऊ शकतो. केवळ सॅमसंगच्या फोनमध्ये हा कोड वापरता येणार नाही. यासोबतच iPhone मध्ये अ‍ॅन्ड्रॉईडच्या जागी iOS ऑपरेटींग सिस्टीम असल्यासही हा कोड वापरता येणार नाही. 


फोनमध्ये कुणी काय पाहिलं? याचा खुलासा


हा कोड वापरल्याने माहिती मिळेल की, तुमच्या फोनमध्ये शेवटी कोणतं अ‍ॅप उघडलं गेलं. सेटींगसोबत काही छेडछाड करण्यात आलीये का? यासोबतच कुणी मेसेज वाचले किंवा व्हिडिओ पाहिले का? हे सगळं जाणून घेता येतं. इतकेच काय तर त्या व्यक्तीने जर तुमच्या फोनमधील हिस्ट्री डिलिट केली तरीही तुम्ही या कोडच्या माध्यमातून ते सगळं बघू शकता.


कशी मिळवाल माहिती?


स्टेप १


फोनचे डिटेल्स जाणून घेण्यासाठी *#*#4636#*#* हा कोड डायल केल्यावर एक वेगळी विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये फोनशी निगडीत माहितीचे पर्याय दिले जातील. त्या पर्यायांमध्ये फोन यूज एक पर्याय असेल. त्यावर क्लिक केलं तर एक नवीन विंडो ओपन होईल. 
 
स्टेप २


फोन इन्फर्मेशन पर्यायावर टॅब केल्यावर आणखी एक विंडो ओपन होईल. यात फोनचे सगळे डिटेल्स जसे IMEI नंबर, वॉईस टाईप, फोन नंबर, सध्याचं नेटवर्क ही माहिती मिळेल. 


स्टेप ३ 


यासोबतच पहिल्या विंडोमध्ये दिसणा-या यूसेज स्टेटिक्सच्या पर्यायावर क्लिक केल्यास वेगळी विंडो ओपन होईल. यात फोनमधील इन्स्टॉल अ‍ॅपची माहिती असते. यात अ‍ॅपचा यूज करण्याचा लास्ट टाईम आणि टोटल यूजही दिसतं.