Tech News : स्मार्टफोन (SmartPhone) आल्यापासून इंटरनेटचा (Internet) वापर खूप वाढला आहे. बहुतांश वेळा इंटरनेट डेटा कमी पडतो.  अशा वेळेस रिचार्ज करण्याशिवाय किंवा जवळच्या व्यक्तीकडून हॉटस्पॉट (Hotspot) घ्यावा लागतो. मात्र डेटा संपल्यानंतर फुकटात इंटरनेट वापरता येतं. यामुळे रिचार्ज करायचीही गरज भासत नाही. तसेच हॉटस्पॉटही घ्यावा लागत नाही. (know how to use free wifi after end mobile data secret trick facebook)


असं मिळवा फुकटात इंटरनेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकनुसार, स्थानिक व्यवसायांकडे वाय-फाय हॉटस्पॉट (WiFi) असतं. हे वाय-फाय खात्रीलायक असतात. अनेकदा फ्रीमध्ये वायफायसह कनेक्ट करता येतं.


 फेसबुककडे (Facebook) वाय-फाय फाउंडर नेटवर्क आहे. जिथून मोफत इंटरनेट वापरता येतं.  हे फीचर फेसबुकमध्येच आहे. याला सिक्रेट टूल म्हणता येईल. Android आणि iOS यूजर्स त्याचा वापर करू शकतात.


फेसबूकवरुन असं शोधा वायफाय हॉटस्पॉट


फेसबूकवर थ्री-लाइन मेनूवर क्लिक करा. त्यानंतर Settings and Privacy या ऑप्शनवर क्लि करा.  त्यानंतर फाइंड वाय-फायवर (Find Wifi) जा. यानंतर फेसबुकवर आसपास उपलब्ध असलेल्या पब्लिकवाय-फाय हॉटस्पॉटची माहिती मिळेल. तसेच मॅप आणि लोकेशनचीही माहिती मिळेल.
 
त्यानंतर See More वर वाय-फाय हॉटस्पॉटबद्दल  माहिती मिळेल. तुम्हाला वाय-फायचं नाव आणि स्पीड जाणून घेता येईल. पर्यायावर क्लिक केल्यावर तेथे जाण्याचं डायरेक्शन पाहता येईल. मात्र सर्व वाय-फाय हॉटस्पॉट्स फ्री असतीलच असे नाही. काही पेडही असू शकतात.


टेलिकॉम कंपन्यानांकजून फ्री डेटा


अनेक टेलिकॉम कंपन्या फ्री डेटा देतात. टेलिकॉम कंपनीच्या अधिकृत अॅपवरून रिचार्ज केल्यास, Airtel Rs 359 वरील सर्व रिचार्जवर 1GB डेटासह 2 कूपन देते. तर 479 रुपयांच्या रिचार्जवर कंपनी 1GB डेटासह 4 कूपन देते. जिओ आणि व्होडाफोन-आयडियाकडेही अशा अनेक ऑफर्स आहेत.