iQOO Neo 6 5G Maverick Orange Variant Launched: सध्या जगात 5G स्मार्टफोनचा बोलबाला पाहायला मिळत आहे. जर तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे एका स्मार्टफोनचा पर्याय आहे. स्मार्टफोन निर्माता iQOO ने आपला 5G स्मार्टफोन iQOO Neo 6 5G या नवीन कलर व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन यावर्षी मे मध्ये लाँच करण्यात आला आहे. यावेळी फक्त एका नवीन कलर व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये कोणते फीचर्स दिले असून त्याची किंमत किती आहे. तसेच हा स्मार्टफोन केव्हा आणि कुठून खरेदी करता येईल? याबद्दल जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

iQOO Neo 6 5G किंमत


iQOO Neo 6 5G हा नवीन कलर व्हेरिएंट Maverick Orange मध्‍ये लॉन्‍च झाला आहे. हा स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह बाजारात लाँच करण्यात आला आहे आणि त्याची किंमत 33,999 रुपये आहे. हा फोन 23 जुलैपासून Amazon आणि iQOO च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केला जाऊ शकतो.


iQOO Neo 6 5G कॅमेरा


कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर iQOO Neo 6 5G मध्ये तुम्हाला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 64MP Samsung ISOCELL GW1P सेन्सर, 8MP वाइड-एंगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला सेल्फी घेण्यासाठी आणि व्हिडीओ कॉल करण्यासाठी 16MP फ्रंट कॅमेरा देखील दिला आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील दिला आहे.


iQOO Neo 6 5G वैशिष्ट्ये


Amazon सूचीनुसार, हा स्मार्टफोन Snapdragon 870 SoC प्रोसेसरवर काम करेल आणि तुम्हाला 6.62-इंच फुल HD + E4 AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्यूशन मिळेल. iQOO Neo 6 5G Android 12 OS वर चालू शकतो. यात UFS 3.1 स्टोरेज दिले आहे. iQOO Neo 6 5G मध्ये 4700mAh बॅटरी आहे जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.