ACसह पंख्याचा वापर योग्य की अयोग्य? जाणून घ्या योग्य पद्धत ज्यामुळे थंडावाही मिळेल अन् वीजही वाचेल
एसीसोबत पंख्याचा वापर योग्य की अयोग्य?
मुंबई : अनेकदा आपण बाहेरुन घरात आल्यावर एसी सुरु करतो. पण एसीच्या वापरामुळे लाईट बिल अधिक येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे ज्यांच्या घरात एसी आहे, त्यांना नेहमीच वाटतं की लाईट बिल कमी यावं. यासाठी अनेक जण विविध पर्याय अवलंबून पाहतात. तर काही जणांचं असंही म्हणंन असतं की एकाच वेळेस एसी आणि पंखा सुरु ठेवल्याने वीज बिल नियंत्रणात राहतं. (know right method of use fan and air conditoner time and save energy bill)
एसीसह फॅनचा योग्य वापर करून आपण एसीचा गारवा वाढवू शकता अन आपले बिल कमी करू शकता. अशा परिस्थितीत, एसीसह पंखा कसा वापरावा हे जाणून घेऊयात जेणेकरून आपल्याला अधिकाअधिक गारवा मिळेल. एसीसह पंख्याची नेमकी भूमिका काय आहे ते जाणून घेऊयात.
पंख्याचा वापर कसा करावा?
एसीसह पंखा वापरावा, तसेच एसीचं तापमान वाढवून घरातील वातावरण थंड ठेवू शकतो, असं म्हटलं जातं. यासाठी पंखा कमी स्पीडमध्ये वापरावा. याचा फायदा असा होतो की, एसीमुळे संपूर्ण घरात थंडावा निर्माण होतोच, तसंच घरातील प्रत्येक कोपऱ्यातील व्यक्तीला थंडावा जाणवतो.
एसीसह पंखा वापरण्याचे लाभ
पंखा वापरल्याने मोठ्या घरातही सर्वदूर हवा पोहचते अन् थंडावा निर्माण होतो. तसेच, आपल्या एसीचे तापमान कमी ठेवावे , ज्यामुळे आपल्या एसीच्या कंप्रेसरवर ताण येत नाही सोबतच विजेचे बिल खूप कमी येते. यासह आपण कमी विजेच्या बिलात अधिक थंडावा अनुभवू शकता. अशा पद्धतीने काही वेळ एसी वापरल्यानंतर तुम्ही पंख्यावरही काम चालवू शकता.
पंख्याचा वापर केव्हा टाळावा?
घर लहान असेल तर एसीसब पंख्याचा वापर करु नये. तसेच जर तुमची खोली अशा ठिकाणी असेल जिथे जवळच रस्ता आहे आणि तेथे धूळ आहे, तर पंख्याचा वापर करणं टाळावं. यामुळे, आपल्या एसी फिल्टरवर धूळ जमा होते. परिणामी फिल्टर बदलावे लागेल. या व्यतिरिक्त आपल्याला पुन्हा पुन्हा स्वच्छ करावे लागेल.