Android आणि iPhone वर WhatsApp व्हॉईस कॉल रेकॉर्ड करायचाय? जाणून घ्या..
आता व्हॉट्सअॅपवर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. काही सोप्या पध्दतीने व्हॉटसअॅप कॉल अगदी सहजपणे रेकॉर्ड करता येतो.
मुंबई : आज WhatsApp हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. मित्रांशी, नातेवाईकांसोबत गप्पा मारण्यासाठी, डाक्यूमेंट पाठवण्यासाठी आणि फोटोंची देवाणघेवाण करण्यासाठी WhatsApp चा वापर केला जातो. याशिवाय, व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल्सही करता येतात. इतकंच नाही तर व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी कायम नवनवीन फीचर्स अपडेट करत राहतं. असं असलं तरी, अजूनही असे युजर्स आहेत जे व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करणं माहिती नाही. यासाठी संपूर्ण बातमी वाचा.
खरंतर, व्हॉट्सअॅपवर कॉल रेकॉर्ड करण्यात कोणतीही अडचण येत नाही. काही सोप्या पध्दतीने अगदी सहजतेणे व्हॉटसअॅप कॉल रेकॉर्ड करता येतो. मात्र असं असलं तरी हे कायम लक्षात घ्या की कोणाच्याही परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे योग्य नाही. काही देशांमध्ये तर असं करणं बेकायदेशीर आहे. त्यामुळे, कोणाचाही कॉल रेकॉर्ड करण्यापूर्वी, आपण त्याला याबद्दल माहिती देणं किंवा त्याची परवानगी घेणं आवश्यक आहे.
Cube ACR डाउनलोड करा
तुमच्याकडे Android फोन असेल तर, तुमच्यासाठी WhatsApp कॉल रेकॉर्ड करणं हे आणखी सोपं आहे. मात्र, WhatsApp कॉलसाठी रेकॉर्डिंग करण्याची मुभा सर्व Android फोनवर देत नाहीत. त्यामुळे एकदा तुमच्याकडे कॉम्पैटिबल फोन आहे की नाही याची खात्री करुन घ्या. कॉल रेकॉर्ड करण्यासाठी, तुम्हाला सर्वात आधी Google Play Store वर Cube ACR नावाचे अॅप शोधावं लागेल आणि ते तुमच्या फोनमध्ये इंस्टॉल करावं लागेल.
Android वर कॉल कसे रेकॉर्ड करावे
Cube ACR अॅप चा वापर करुन तुम्ही व्हॉट्सअॅप व्हॉइस कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुमच्या फोनच्या स्टोरेजमध्ये फाइल्स सेव्ह करण्याची परवानगी द्यावी लागते. यासाठी सर्वात आधी तुम्हाला हे अॅप तुमच्या फोनवर इन्स्टॉल करावं लागेल. त्यानंतर अॅप बॅकग्राउंडमध्ये चालू ठेवून तुमच्या व्हॉट्सअॅप अकाउंट वरुन व्हॉईस कॉल करा.
यामुळे Cube ACR अॅप आपोआप तुमचा कॉल रेकॉर्ड करणं सुरू करेल. रेकॉर्डिंग सुरू न झाल्यास, तुम्ही Cube ACR अॅप उघडू शकता आणि VoiP कॉल करण्याचा ऑप्शन निवडून, पुन्हा WhatsApp कॉल करू शकता.
iPhone कॉल रेकॉर्डिंग
iPhone वर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी, सर्वात आधी तुमचा आयफोन तुमच्या Mac शी केबल वापरून कनेक्ट कराव लागेल आणि तुमच्या iPhone वर दिसणार्या या कंप्युटर पर्यायावर टॅप करा. नंतर तुमच्या Mac वर स्पॉटलाइट लाँच करण्यासाठी सीएमडी + स्पेसबार दाबा आणि क्विकटाइम प्लेयर सर्च करा.
त्यानंतर, फाइल या पर्यायावर नेव्हिगेट करा आणि नवीन ऑडिओ रेकॉर्डिंग निवडा. आता पर्याय म्हणून आयफोन निवडा आणि अॅपमधील रेकॉर्ड बटणावर क्लिक करा. आता तुम्ही तुमचा iPhone वापरून कोणालाही WhatsApp कॉल करा. तुमचा कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर आणि लवकरात लमध्ये रेकॉर्डिंग स्टॉपचं बटण दाबा. आता तुम्ही ती फाइल तुमच्या Mac वर सेव्ह करू शकता.