मुंबई : विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवाची अनेक कामे खूप सोपी झाली आहेत. आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे जवळपास सर्वच गोष्टी सुधारण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसतात. असाच एक महान शोध म्हणजे लिफ्ट. लिफ्टच्या साहाय्याने उंच इमारतीत जाण्यासाठी लोकांना जास्त कष्ट करावे लागत नाहीत किंवा जास्त वेळ वाया घालवावा लागत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिफ्टमध्ये आरसे का असतात?


ऑफिस असो वा मॉल किंवा इतर कुठलीही उंच इमारत, अनेक ठिकाणी लिफ्ट बसवली जाते. तुम्हीही दैनंदिन जीवनात याचा वापर करत असाल. काही काळापूर्वी लिफ्टमध्ये आरसे बसवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. अनेक लिफ्टमधील आरसेही तुमच्या लक्षात आले असतील. चला तर मग जाणून घेऊया त्यामागचे कारण काय आहे.


जेव्हा लोकांनी लिफ्टचा वापर केला तेव्हा अनेकांना लिफ्टचा वेग खूप वेगवान वाटला. लोकांच्या या तक्रारीचा विचार केला असता असे समजले की, लोकांचे लक्ष लिफ्टच्या भिंतींकडे होते, त्यामुळे त्यांना लिफ्टचा वेग अधिक जाणवत होता. यानंतर लिफ्ट बनवणाऱ्या कंपन्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी लिफ्टच्या भिंतींवर आरसे लावण्यास सुरुवात केली.


अनेक लोकांचा गैरसमज


लोकांचा गैरसमज होता लिफ्टमध्ये आरसे चेहरा बघण्यासाठी असतात. मात्र, आरसा बसवल्यानंतर लोकांचे लक्ष मन वळवलेल्या आरशाकडे जाऊ लागले आणि त्यांचा गैरसमज दूर होऊ लागला. यामुळेच लिफ्टमध्ये आरशांचा वापर केला जातो.