आयडिया-व्होडाफोनचे जुने सिम बंद होणार?
युजर्ससाठी काय बदल होणार हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.
नवी दिल्ली : आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडियाच्या मर्जरला अंतिम मंजुरी मिळालीय. आता कंपन्यांनी आवश्यक ते फेरबदल करण्याचा निर्णय घेतलाय. मॅनेजमेंटमध्येही मोठा बदल होताना दिसतोय. परंतु, या मर्जरचा परिणाम ग्राहकांवरही होणार आहे? कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कंपनी लवकरच आपल्या नव्या नावासहीत नवे सिम कार्ड ग्राहकांना उपलब्ध करून देणार की ग्राहकांना जुन्याच सिमवर नवे ऑफर्स मिळतील? असे अनेक प्रश्न ग्राहकांच्या मनात घोळत आहेत. अशावेळी युजर्ससाठी काय बदल होणार हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.
सिम बदलण्याची गरज आहे?
आयडिया आणि व्होडाफोनच्या मर्जरनंतर ग्राहकांना नवीन सिम घेण्याची आवश्यकता नाही. कंपनी आपल्या जुन्या सिस्टममध्येच युझर्सचा डाटा अपडेट करेल. सोबत त्यांना जुन्या सिम आणि नंबरवरच नवीन ऑफर्स मिळतील.
कदाचित कंपनी आपल्या नव्या नावासहीत नवे सिम युझर्ससाठी आणू शकेल, अशी शक्यताही वर्तवण्यात येतेय. परंतु हे सिम नव्या युझर्ससाठी असतील.