Komaki LY Electric Scooter on Discount: इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी Komaki ने सणांच्या आधी जबरदस्त ऑफऱ आणली आहे. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरवर तब्बल 21 हजारांचा डिस्काऊंट जाहीर केली आहे. कंपनीने आपली Komaki LY इलेक्ट्रिक स्कूटरला 21 हजारांनी स्वस्त विकत असल्याची माहिती दिली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर याची माहिती देण्यात आली आहे. आधी या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख 34 हजार 999 रुपये होती. पण आता एक्स शोरुममध्ये या दुचाकीसाठी 1 लाख 13 हजार 999 रुपये मोजावे लागत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या गणेशोत्सव सुरु असून यानंतर दसरा, दिवाळी असे रांगेत सण असणार आहेत. फेस्टिव्हल सीझनच्या पार्श्वभूमीवर कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर 21 हजारांनी स्वस्त विकणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. आता या स्कूटरमध्ये नेमके काय फिचर्स आणि स्पेसिफिकेशन आहेत हे जाणून घ्या. 


Komaki LY ची रेंज आणि टॉप स्पीड


कंपनीच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने ड्युअल बॅटरी पॅक दिला आहे. ही बॅटरी रिमूव्हेबल आहे. म्हणजेच तुम्ही चार्ज करण्यासाठी ही बॅटरी बाहेर काढू शकता. ड्युअल बॅटरी असल्याने कंपनी ही इलेक्ट्रिक स्कूटर 160 ते 200 किमीचा रेंज देत असल्याचा दावा करत आहे. पण सिंगल बॅटरीमध्ये ही स्कूटर 80 ते 85 किमी रेंज देण्यात सक्षम आहे. 


कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक स्कूटर 4 तासात 0 ते 90 टक्के चार्जिग होते. सिंगल बॅटरीत ही इलेक्ट्रिक स्कूटर 55 ते 60 किमी स्पीड देते आणि ड्युअल बॅटरीत स्कूटर तितकीचा स्पीड देते. पण ड्युअल बॅटरीत स्कूटरची रेंज वाढते. 


किंमतीबद्दल बोलायचं गेल्यास सिंगल बॅटरी असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 95 हजार 866 रुपये (एक्स-शोरूम) आहे. तसंच ड्युअल बॅटरी असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख 13 हजार 999 (एक्स-शोरूम) आहे. आगामी सणांमध्ये होणारी खरेदी लक्षात घेतच कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरवर 21 हजारांचा डिस्काऊंट जाहीर केला आहे. 


Komaki LY चे फीचर्स


कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये TFT स्क्रीन दिली आहे, ज्यामध्ये ऑन बोर्ड नेव्हिगेशन, साऊंड सिस्टम आणि कॉलिंगचे पर्याय मिळतात. याशिवाय स्कूटरमध्ये फ्रंटला LED लाइट्स देण्यात आली आहेत. तसंच 3000 WATT HUB MOTOR आणि 38 AMP CONTROLLER देण्यात आलं आहे. याशिवाय स्कूटरमध्ये पार्किंग असिस्ट्स, क्रूझ कंट्रोल और रिव्हर्स असिस्ट्स सारखे फिचर्स मिळतात.