नवी दिल्ली : स्मार्टफोन निर्माता 'ओेप्पो' कंपनी नवीन सीरीज लॉन्च करणार आहे. 'ओप्पो' कंपनीच्या स्मार्टफोनला उत्तम कॅमेऱ्यासह नव्या तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते. यासाठी कंपनीने नवीन स्मार्टफोनमध्ये 'इन स्क्रिन फिंगर प्रिंट सेंसर'चा समावेश केला आहे. माहीतीनुसार, चीनमध्ये 'ओप्पो'चा नव्या सीरीजचा स्मार्टफोन ऑक्टोंबर महिन्यात लॉन्च केल्यानंतर कंपनीला मोठा फायदा झाला होता. यामुळे कंपनी या फिचरचा स्मार्टफोन भारतीय बाजारात घेवून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात 'ओप्पो' कंपनीच्या स्मार्टफोनला जास्त पसंती दाखवली जात आहे. माहीतीनुसार या स्मार्टफोनची किंमत २० हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा स्मार्टफोन ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. ऑफलाईन बाजारातच्या तुलनेत ई- कॉमर्स वेबसाईटवर विकणाऱ्या स्मार्टफोनची किंमत कमी असते. याचा फायदा सामान्य लोकांना होणार आहे. स्मार्टफोनमध्ये कॅमेरापासून तर चार्जिंग सॉल्यूशनचा समावेश करण्यात आला आहे. भारतात ऑनलाईन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ होताना दिसते आहे. 


कंपनीच्या माहीतीनुसार, ऑफलाईन बाजारात ओप्पोने प्रगती केली आहे. म्हणूनच कंपनीला ऑनलाईन बाजारात त्यांचे स्थान निर्माण करायचे आहे. स्मार्टफोनची वाढती मागणी बघून बाजारातील अनेक स्मार्टफोन निर्मात्यांना चांगली संधी आहे. अनेकदा पाहिले जाते की, ऑनलाईन प्रोडक्ट खरेदी करताना ग्राहक प्रोडक्टच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेतो. त्यानंतरच प्रोडक्ट खरेदी करायचा विचार करतो.