भारतात विक्रीसाठी लेनोव्हो K8 नोट स्मार्टफोन उपलब्ध
शुक्रवारी म्हणजे आज दुपारी १२ वाजेपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
मुंबई : लेनोव्हो K8 नोट स्मार्टफोन आज भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. शुक्रवारी म्हणजे आज दुपारी १२ वाजेपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
मागील आठवड्यात लाँच करण्यात आलेल्या K8 नोट स्मार्टफोनच्या 3 जीबी फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये आणि 4 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे.
लेनोव्होचा हा पहिला स्मार्टफोन आहे, ज्यात ड्युल रिअर कॅमेरा सेटअप आहे.
लेनोव्हो K8 स्मार्टफोनचे आकर्षक फीचर्स
5.5 इंच स्क्रीन
रेझ्युलेशन 1080×1920 पिक्सल
कॉर्निंग गोरिल्ला ग्लास
डेका कोअर मीडियाटेक Cortex-A53 प्रोसेसर
यात 3 जीबी आणि 4 जीबी रॅमचे दोन व्हेरिएंट उपलब्ध
मेमरी 128 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते
अँड्रॉईड नॉगट 7.1 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित
13 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल ड्युल रिअर कॅमेरा
13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE,
वाय-फाय, जीपीएस, ऑडिओ जॅक
बॅटरी तब्बल 4000 mAh
स्पेशल लाँच डे ऑफर
स्मार्टफोनच्या लाँच डे ऑफर्समध्ये मोटोचे हेडफोनवर ९०० रुपयांचं डिस्काउंट देण्यात आलं आहे.
तर आयडिया यूजर्सनं हा स्मार्टफोन खरेदी केल्यास त्यांना ३४३ रुपयांच्या रिचार्जवर 64 जीबी 4G डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.