नवी दिल्ली : चीनी कंपनी लिनोवोने के सीरिजचा नवा स्मार्टफोन के ८ भारतात आणला आहे. हा स्मार्टफोन केवळ ऑफलाइन उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीतर्फे ट्विट करण्यात आली आहे.
हा के ८ सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असून त्याची बॅटरी ४००० एमएएच आहे. त्याची किंमत १०,४९९ रुपये असून वॅनोम ब्लॅक आणि फाइन गोल्ड कलरमध्ये उपलब्ध आहे. २६ सप्टेंबरला देशभरातील ऑफलाइन स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहे.. स्मार्टफोन कंपनीच्या साइटवर याबद्दल माहिती देण्यात आली आहे.


लेनोवो के८ ची वैशिष्ट्ये


 २.५ डी ७२०x१२८० पिक्सल ग्लास, ५.२ इंच एचडी डिस्प्ले
२.३GHzचा मीडियाटेक हीलियो P२० प्रोसेसर 
३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज 
फ्लॅश लाईटसह १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा 
४००० mAh नॉन रिमूवेबल बॅटरी
अॅण्ड्रोईड नूगा७.१.१, डॉल्बी अॅट्मोस स्पीकर, ड्युअल सीम सपोर्ट
4 जी व्होल्ट
बॅक पॅनेलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर
फोनचा आकार १४७.९ x ७३.७ x ८.५५ मिलीमीटर आणि १६५ ग्रॅम वजन