मुंबई : चीनी फोन निर्माता Lephone कंपनीने मोठ्या काळानंतर आपला लेटेस्ट स्मार्टफोन Dazen 6A भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. भारतीय बाजारात Dazen 6A या फोनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. एक नजर टाकूयात या फोनमध्ये असलेल्या फिचर्सवर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Lephone Dazen 6A हा फोन भारतीय बाजारात ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहे. प्रमुख फिचरचं बोलायचं झालं तर या फोनमध्ये फेस अनलॉक, ड्युअल रियर कॅमेरा, 18:9 पॅनल आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे. 
गेल्यावर्षी Lephone ने Lephone W15, Lephone W2 आणि Lephone W17 बाजारात लॉन्च केले होते. या फोन्सची किंमत 10 हजारांदरम्यान होती.


Lephone Dazen 6A स्पेसिफिकेशन


Lephone Dazen 6A हा स्मार्टफोन अँड्राईड 7.0 नूगा आऊट ऑफ द बॉक्सवर चालतो. यामध्ये 5.7 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच सुरक्षेसाठी 2.5डी कर्व्ड ग्लास देण्यात आली आहे. क्वाड-कोअर मीडियाटेक एमटी6737 एच प्रोसेसर आहे. 3GB रॅम, इनबिल्ट स्टोरेज 32GB असून मेमरी कार्डच्या सहाय्याने स्टोरेज 128 GB पर्यंत वाढवता येऊ शकतो.


Lephone Dazen 6A फोनमध्ये 13+0.3 MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ड्युअल टोन एलईडी फ्लॅश, फ्रंट कॅमेरा 5 MP देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 3000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.