मुंबई : स्मार्टफोन बनविणाऱ्या दक्षिण कोरियाच्या LG इलेक्ट्रॉनिक्सने भारतीय बाजारपेठेत आपला एक नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे मच्छर पळविण्याची क्षमता या फोनमध्ये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने सांगितले की, LG K7i या स्मार्टफोनमध्ये 'मॉसकिटो अवे' नव्या टेक्नोलॉजीसोबत लॉन्च करण्यात आला आहे. या फोनच्या मागच्या बाजूला एक स्पीकर देण्यात आला आहे जो अल्ट्रासॉनिक फ्रक्वेंसीची निर्मिती करतो.


कंपनीने दावा केला आहे ही हा फोन मच्छरांना यूजर्सच्या जवळ येऊन देत नाही. हा एक बजेट स्मार्टफोन आहे. हा फोन गुगलच्या अँड्रॉईड ऑपरेटींग सिस्टम मार्शमैलो ६.० वर चालतो.


LG K7i या स्मार्टफोनची किंमत भारतीय बाजारपेठेत ७,९९० रुपये आहे. हा फोन देशभरातील सर्व रिटेल आउटलेटमध्ये उपलब्ध आहे.


LG K7i फोनचे फिचर्स


- ५ इंचाचा डिस्प्ले


- क्वॉड कोअर प्रोसेसर


- २ जीबी रॅम


- १६ जीबी इंटरनल मेमरी (६४जीबी पर्यंत वाढवता येणार)


- ८ मेगापिक्सल रियर कॅमेरा


- ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा