मुंबई : एलजीने आपला तगडा जी ७ स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. १६ मेगापिक्सल कॅमेऱ्याचा हा फोन आहे. या फोनमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्यात. तर इंटरनल स्टोरेज माक्रोएसडी कार्डच्या मदतीने २ टीबीपर्यंत मेमरी वाढविण्यात येऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

LG चा G7+ThinQ हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला असून हा स्मार्टफोन ३९,९९० रुपयांना कोणत्याही रिटेल शॉपमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर फ्लिपकार्डवर तो मिळू शकणार आहे. यामध्ये अत्याधुनिक प्रकारचे वैशिष्टये आहेत. हा  अॅन्ड्राईड ८.० आऊट ऑफ द बॉक्स आहे. या डिवाइसमध्ये ६.१ इंच फुलव्हिजन सुपर ब्राइट डिस्प्ले क्युएचडी १९.५:९ आस्पेक्ट रेशिओ आहे. याचबरोबर यामध्ये क्वॉलकॉम स्नेपड्रेगन ८४५ एसओसी देण्यात आले 


फोटोग्राफीसाठी यामध्ये ड्युएल कॅमेरा सेटअप असून, यामध्ये १६ मेगापिक्सल सुपर वाइड अँगल लेंस एफ १.९ अपर्चर आणि १६  मेगापिक्सल स्टॅडर्ड लेन्स एफ १.६ चा काँबिनेशन देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगला फोनमध्ये ८ मेगापिक्सल वाइड अँगल लेन्ससमोर आहे.