लहानग्याची माकडाशी गट्टी
वर्षभरापासून वानरांशी त्याची गट्टी कायम आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हुबळी : माकड कधी कुणाला इजा पोहोचवतील याचा काही भरोसा नसतो, असं म्हणतात, मात्र कर्नाटकातील हुबळीमधील हा लहानगा आपल्या अंगणातील या वानरांसोबत, बिनधास्त फिरतो, त्यांना घरातून खाऊ आणून खाऊ घालतो.
ही दोस्ती तुटायची नाय
एवढं असलं तरी त्याला एकही वानर इजा पोहोचवत नाहीत, त्यांचं फक्त त्याच्याकडून मिळणाऱ्या खाण्यावर लक्ष असतं, हा मुलगा १८ महिन्यांचा आहे. त्याला वानरांमध्ये जाण्याची तशी भीतीही वाटत नाही. वर्षभरापासून वानरांशी त्याची गट्टी कायम आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.