LML Star electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरसाठी फ्रीमध्ये बुकींग सुरु, पाहा लूक
LML Star electric Scooter booking : कंपनीच्या वेबसाईटवर जावून करता येणार बुक.
LML Star electric Scooter Booking: LML ने त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर LML Start चे बुकिंग सुरु केलंय. एलएमएल कंपनीने गेल्या महिन्यातच आपल्या तीन इलेक्ट्रिक टु व्हिलर गाड्या आणल्या होत्या. ज्यात या स्कूटरचा समावेश होता. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर नवीन Star EV साठी ऑनलाइन बुकिंग सुरू केल्याचे सांगितले. ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवरून पैसे न भरता स्कूटर बुक करू शकणार आहेत.
ही कंपनी भारतात परतल्यानंतर त्यांचं हे पहिलं उत्पादन असेल. या स्कूटरचे डिझाईन इतर इलेक्ट्रिक स्कूटर्सपेक्षा खूपच वेगळे दिसते आहे. या स्कूटरमध्ये 360-डिग्री कॅमेरा, हॅप्टिक फीडबॅक आणि एलईडी लाइटिंग देण्यात आली आहे.
एलएमएलचे एमडी आणि सीईओ योगेश भाटिया यांनी माहिती देताना सांगितले की, 'आम्हाला हे जाहीर करताना आनंद होतोय की, आमचं फ्लॅगशिप उत्पादन, एलएमएल स्टारचे बुकिंग सुरू झाले आहे. लोक आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात आणि एक पैसा खर्च न करता स्कूटर खरेदी करू शकतात.'
नवीन LML स्टार Ola S1 एअर एंट्री-लेव्हल स्कूटर, बजाज चेतक, TVS iQube आणि इतर इलेक्ट्रिक स्कूटर सोबत स्पर्धा करणार आहे. नवीन स्कूटरची किंमत 1 लाख ते 1.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे.