Mahindra ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, किंमत जाणून तुम्हाला बसेल धक्का
इलेक्ट्रिक 3-व्हीलर सेगमेंटमध्ये महिंद्राचा बाजारातील हिस्सा 73.4 टक्के आहे, ज्यामुळे कंपनी या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
मुंबई : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढतच चालली आहे. आता कंपन्यांसह ग्राहकांनीही या वाहनांमध्ये रस घेण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या वाहन निर्मात्यांबरोबरच, लहान आणि मोठे स्टार्टअप देखील आता इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणत आहेत. त्यात आता महिंद्रा इलेक्ट्रिकने ट्रेओ ऑटो, ट्रेओ जोर डिलिव्हरी व्हॅन, ट्रेओ टिपर प्रकार आणि ई-अल्फा मिनी टिपरसह ऍटम क्वाड्रिसायकल सादर केली आहे.
इलेक्ट्रिक 3-व्हीलर सेगमेंटमध्ये महिंद्राचा बाजारातील हिस्सा 73.4 टक्के आहे, ज्यामुळे कंपनी या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
EV 4 प्रकारात लॉन्च केले जाईल
Mahindra Atom ला चार प्रकारांमध्ये लॉन्च केले जाईल - K1, K2, K3 आणि K4, पहिले दोन प्रकार 7.4 kWh बॅटरी पॅकसह येतील, तर इतर दोन शक्तिशाली 11.1 kWh बॅटरी पॅकसह येतील.
Mahindra Atom चे K1 आणि K3 बेस व्हेरियंट एअर कंडिशनिंग सिस्टमसह येत नाहीत, तर K2 आणि K4 मध्ये हे वैशिष्ट्य आहे. असा अंदाज आहे की, कंपनी लवकरच अॅटम क्वाड्रिसायकल भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे.
Mahindra Atom क्वाड्रिसायकल
इलेक्ट्रिक पॉवरवर चालणारे Mahindra Atom आरामदायी आणि स्मार्ट वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
Mahindra Atom सोबत, महिंद्राने इलेक्ट्रिक अल्फा टिपर देखील बाजारात आणले आहे, जे ई-अल्फा मिनी प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ई-अल्फा मिनी टिपर 1.5 kWh बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे. जे एका चार्जवर 80 किमी पर्यंत धावते.
त्याची लोडिंग क्षमता 310 किलो आहे. सध्या महिंद्रा अॅटम हे व्यावसायिक वाहन म्हणून लाँच करण्यात आले आहे, जे वैयक्तिक वापरासाठी लॉन्च केले जाईल की, नाही हे अद्याप माहित नाही.
किंमत असेल फक्त 3 लाख!
महिंद्र अॅटम ही केवळ लूक आणि फीचर्समध्ये उत्तम नाहीय, तर त्याची किंमतही खूपच कमी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आतापासून असा अंदाज लावणे योग्य ठरणार नाही, परंतु या कारची किंमत सुमारे 3 लाख रुपये असेल असा अंदाज आहे.
महिंद्रा अॅटमचा कमाल वेग ५० किमी/तास असेल आणि तो पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ५ तास लागतील. अॅटम इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकल एका चार्जवर 120 किमी पर्यंत चालवता येते.