Mahindra Rs 18 Crore Car: महिंद्राने लॉन्च केली 18 कोटींची Electric Car; फिचर्स पाहून थक्क व्हाल! एकदा चार्ज केल्यास...
Mahindra Rs 18 crore Pininfarina Battista: या गाडीची डिलेव्हरी मागील वर्षांपासून जगातील अनेक देशांमध्ये केली जात असून भारतामध्ये पहिल्यांदाच ही गाडी लॉन्च करण्यात आली.
World Fastest Electric Car: हैदराबादमधील ई-मोटर शोमध्ये भारतीय कार निर्मिती क्षेत्रातील कंपनी महिंद्रा अॅण्ड महिंद्राने एक अशी कार लॉन्च केली आहे की जिची जगभरामध्ये चर्चा आहे. महिंद्राने जी गाडी बाजारात आणली आहे ती एक इलेक्ट्रिक हायपरकार आहे. या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रीक कार आहे. या कारचे हक्क महिंद्रांची मालकी असलेल्या पिनिनफेरिना (Pininfarina) या ऑटोमोबाइल कंपनीकडे आहे. या कारचं नाव बटिस्ता (Battista) असं आहे.
वेग आणि ब्रेकही भन्नाट
हायपरकार बटिस्ताची किंमत 18 कोटी रुपये इतकी आहे. कंपनीने मागील वर्षीच या गाडीची अनेक देशांमध्ये डिलेव्हरी सुरु केली आहे. पिनिनफेरिना बटिस्ताने वेगासंदर्भातील अनेक विक्रम यापूर्वीच आपल्या नावे केले आहेत. अॅक्सलरेशनच्याबाबतीत या गाडीने एक नवा प्रोडक्शन विक्रम केला आहे. याशिवाय जितक्या वेगाने ही कार धावते ते पाहता तिची ब्रेक सुद्धा फार खास आहेत. अगदी काही क्षणात ही कार जागेवर थांबू शकते असं तंत्रज्ञान या ब्रेकमध्ये वापरण्यात आलं आहे. कारचं अजून एक वैशिष्ट म्हणजे ही फोर-व्हील ड्राइव्ह कार आहे. म्हणजेच या गाडीची चारही चाकं एकाच वेळेस फिरवता येतात. चार इलेक्ट्रिक मोटर्स 1900 hp पॉवर आऊटपूट देतात आणि 2300 Nm चं पीक टॉर्क आउटपूट निर्माण करतं.
बॅटरीचं वजन एवढं की...
पिनिनफेरिना बटिस्ता 350 किमी प्रती तास या टॉप स्पीडवर धावते. एका इलेक्ट्रीक गाडीचा विचार केल्यास हा वेग सामान्य इलेक्ट्रीक गाड्यांच्या वेगापेक्षा अनेक पटींनी अधिक आहे. या गाडीचा वेग जगातील वेगवान इलेक्ट्रिक कार लोटस इविजा इलेक्ट्रिक हायपरकार आणि टेस्लाच्या एस प्लेडच्या वेगाइतकी आहे. गाडीची बॅटरी पॅक क्षमता 120 kWh इतकी आहे. या बॉटरीमध्ये 6960 लिथियम-आयन सेल आहे. कारची बॅटरी एवढी मोठी आहे की केवळ बॅटरीचं वजन हे गाडीच्या एकूण वजनाच्या एक तृतीयांश इतकं आहे. गाडीचं एकूण वजन जवळजवळ 2 टन इतकं आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यास 482 किमीची रेंज देते.
100 किमी वेगाने धावत असतानाच ब्रेक दाबल्यास...
या गाडीमध्ये बेस्पोक चेसिस आणि सस्पेन्शन ट्यूनिंग आहे. म्हणजेच खराब रस्त्यावरही ही गाडी सहज चालवता येते. गाडी लॉन्च करण्याआधी हजारो किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर ड्राइव्ह करत गाडीची टेस्टींग करण्यात आली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार पिनिनफेरिना बटिस्ता केवळ 1.86 सेकंदांमध्ये 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते. तर 4.75 सेकंदांमध्ये 0 ते 200 किमी वेगाने धावू शकते. गाडीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जेवढ्या वेगात ही धावते तेवढ्या पटकन तिला थांबवताही येतं. 100 किमी वेगाने धावत असताना ब्रेक दाबल्यास 31 मीटरच्या आत गाडी जागेवर थांबते. हा सुद्धा एक विक्रमच आहे.