नवी दिल्ली : भारतातील वाहन निर्माता कंपनी असलेल्या महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा कंपनी आपली KUV100 नव्या रुपात बाजारात लॉन्च करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१६ साली महिंद्रा कंपनीने KUV100 या गाडीच्या माध्यमातून एसयूव्ही सेगमेंटमध्ये एन्ट्री केली होती. मात्र, या गाडीच्या लूकवरुन अनेक ग्राहक या गाडीला एसयूव्ही डिझाईनची हॅचबॅक मानतात. आता जवळपास दोन वर्षांनी कंपनीने या कारमध्ये बदल करुन नव्या रुपात लॉन्च करण्याचा प्लॅन केला आहे.


महिंद्रा KUV100 फेसलिफ्ट भारतात १० ऑक्टोबर रोजी लॉन्च केली जाणार आहे. या कारचं नाव KUV100 NXT असं असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कारची डिझाईन तशीच ठेवण्यात आली आहे मात्र, एक्सटीरियरमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.


पाहूयात काय असेल बदल


कारचा फ्रंट बंपर बदलण्यात येणार आहे आणि फॉग लँपच्या चारही बाजूंना प्लॅस्टिक कव्हर दिलं जाणार आहे. कारच्या पाठीमागेही नवा बंपर, नवं डिझाईन असलेले वायपर आणि नवी टेल लाईट देण्यात येणार आहे. यासोबतच कारमध्ये डायमंड कट १५ इंच एलॉय व्हिल देण्यात येणार आहे.


फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये नवे हेडलँप आणि महिंद्रा XUV500 सारख्या ग्रिल देण्यात येणार आहे. ऑनलाईन मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवी KUV100 ची लांबीतही वाढ करण्यात येणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या KUV100ची लांबी ३६७५ mm आहे तर नव्या कारची लांबी ३७०० mm असणार आहे.


आधीच्या कार प्रमाणे नवी कारही सहा सिटरचीच असणार आहे. कारमध्ये ७ इंचाची टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टम दिली जाणार आहे. मात्र, ही सिस्टीम अँड्रॉईड ऑटो सपोर्ट करणार नाही. कारच्या इंजिनमध्ये कुठलाच बदल करण्यात येणार नाहीये. तसेच ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनसोबतच लॉन्च करण्यात येणार आहे.