धक्कादायक! तरुणानं गिळला चक्क मोबाईल, डॉक्टरने X-Ray काढला आणि....
पोटात दुखायला लागलं म्हणून X-Ray काढला आणि समोर आलं धक्कादायक सत्य, पाहून डॉक्टरही चक्रावले
कोसोवो: साधारण मुलं नको त्या गोष्टी तोंडात घालतात त्यामुळे त्यांना जपावं लागतं. मात्र एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका तरुणाच्या पोटात दुखायला लागलं. गोळ्या घेतल्या चाचण्या केल्या पण उपाय पडेना. अखेर एक्स रे काढल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला. या तरुणानं चक्क अख्खा मोबाईलच गिळला होता. या तरुणानं नोकिया 3310 फोन गिळल्याचा भयंकर प्रकार समोर आला. हे पाहून डॉक्टरही चक्रावले.
33 वर्षांच्या व्यक्तीने ही करामत केली. नोकिया 3310 फोन हा लाँच झाल्यानंतर त्याच्या मजबुतीसाठी प्रसिद्ध झाला होता. त्याचा दणकटपणा आणि कितीही आपटला तरी पुन्हा सुरू होणारा फोन अशी ओळख होती. हा फोनच चक्क या व्यक्तीनं गिळला. या व्यक्तीच्या पोटात अडकलेला फोन 2 तास शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आला आहे.
जेव्हा त्या व्यक्तीची स्कॅन आणि चाचणी केली गेली तेव्हा असे आढळून आले की फोन 'त्याला पचवण्यासाठी खूप मोठा आहे' आणि हानिकारक रसायने असलेली त्याची बॅटरी जीव घेऊ शकली असती. सुदैवाने, डॉ स्केंडर तेलजाकू यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि मोबाईल यशस्वीपणे बाहेर काढण्यात आला.
ही धक्कादायक घटना कोसोवोची राजधानी प्रिस्टिना इथे घडल्याचं सांगितलं जात आहे. चार दिवस हा फोन तरुणाच्या पोटात होता. त्यामुळे बॅटरीचा केव्हाही स्फोट होण्याची भीती होती. बॅटरीमध्ये घातक पदार्थ असतात ज्यामुळे या व्यक्तीचा जीवही जाऊ शकला असता.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर या डॉक्टरांनी आपल्या फेसबुक पेजवर ही सगळी स्टोरी सांगितली. त्यासोबत त्यांनी मोबाईलचा फोटो देखील शेअर केला आहे. या X-Ray च्या फोटोमध्ये मोबाईल असल्याचं दिसत आहे. या रुग्णाच्या पोटात मोबाईलचे 3 तुकडे झाले होते. त्यातील एक बॅटरी होती जी तरुणासाठी जीवघेणी ठरू शकली असती. त्यामुळे हा फोन पोटातून तातडीनं बाहेर काढणं गरजेचं होतं असं डॉक्टर म्हणाले.
बॅटरीचा पोटात स्फोट होण्याची भीती होती. त्यामुळे तातडीनं ऑपरेशन करावं लागलं. 2 तास शस्त्रक्रिया सुरू होती. सुदैवानं फोन बाहेर काढण्यात यश आलं आहे. 2014च्या एका अहवालानुसार मोबाईल फोन गिळल्याच्या याआधीही घटना समोर आल्या होत्या. 2016 मध्ये 29 वर्षाच्या व्यक्तीनं फोन गिळला होता. त्याचाही जीव वाचवण्यात आला होता.