Maruti Suzuki Baleno and XL6 CNG: देशात मारुति सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. देशभरातील डिलरशिपची संख्या पाहता अंदाज लावू शकता. त्यात सीएनजी गाड्यांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. मारुति सुझुकीने आता सीएनजीच्या दोन वर्जनबाबत मोठी घोषणा केली आहे. सीएनजीची वाढती लोकप्रियता पाहता कंपनी अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करू इच्छिते. कंपनीने नेक्सा डीलरशिपवर विकली जाणारी सीएनजी वाहने लाँच केली आहेत. मारुति बलेनो सीएनजी आणि मारुती एक्सएल 6 सीएनजी वर्जन लाँच केले आहेत. आता तुम्ही कंपनीची प्रीमियम हॅचबॅक बलेनो आणि 7 सीटर कार XL6 CNG व्हर्जनमध्ये खरेदी करू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Baleno आणि XL6 दोन्ही गाड्या अलीकडेच अपडेट केल्या आहेत. त्यांचे एक्सटीरियर बदलण्यासोबतच कंपनीने फीचर्स देखील अपडेट केले आहेत. यामध्ये 360-डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले, 9-इंच डिजिटल टचस्क्रीन, अपडेटेड डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलं आहे. बलेनो 1.2-लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिनसह येते, तर XL6 ला 1.5-लीटर के सीरीज पेट्रोल इंजिन मिळते.


1 नोव्हेंबरपासून DIGITAL RUPEE ची सुरुवात, काय आहे फरक आणि फायदा जाणून घ्या


कंपनीने बलेनो सीएनजीची सुरुवातीची किंमत 8.28 लाख रुपये ठेवली आहे. ही किंमत वाहनाच्या डेल्टा प्रकारासाठी कायम राहील. तर त्याच्या टॉप Zeta व्हेरियंटची किंमत 9.21 लाख रुपये आहे. XL6 CNG फक्त Zeta प्रकारात लाँच केली आहे. त्याची किंमत 12.24 लाख रुपये आहे. या दोन वाहनांसह मारुतिकडे आता एकूण 12 सीएनजी मॉडेल्स आहेत. कंपनी आधीच Celerio, WagonR, Alto 800, Dzire, Swift, Ertiga, Eeco सारख्या वाहनांमध्ये CNG ऑफर करत आहे. यासोबतच कंपनी आपल्या 7 सीटर कार Ertiga मध्ये सीएनजी किट देखील देत होती.