Maruti Brezza SUV : अवघ्या 3 लाखात घरी आणा ब्रेझा; सर्वाधिक विक्री होणारी कार घ्यायची घाई करा
Maruti Brezza SUV : खिशाला परवडणारी, कुटुंबाला सहज समावून घेणारी आणि आनंद देणारी कार खरेदी करण्याच्या विचारात तुम्हीही आहात का? कोणतीही रिस्क न घेता खरेदी करु शकता ही SUV
Maruti Brezza EMI Calculator: पहिली कार.... ऐकायलाच किती कमाल वाटतं ना? प्रत्येकासाठी स्वत:च्या कमाईनं घेतलेली कार ही कायम अतिशय महत्त्वाची आणि खास असते. भारतातही गेल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा दर्जेदार कार्स तयार करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. यातलीच एक कार म्हणजे, लोकप्रिय सबकॉम्पॅक्ट मारुती ब्रेझा. (Maruti Brezza SUV price loan emi latest auto news in marathi )
2016 ला लान्च झाल्या क्षणापासूनच ही कार अनेक कारणांनी प्रकाशझोतात आली, अनेकांची तिला पसंतीही मिळाली. मागील वर्षी तिला नव्या रुपात सादर करण्यात आलं. कारमध्ये सनरुफ, 360 डिग्री कॅमेरा असे फिचर्स देण्यात आले. ज्यामुळं पुन्हा एकदा याच कारकडे अनेकांचा कल वाढला. फेब्रुवारी 2023 पर्यंत ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कारही ठरली. काय म्हणता? तुम्हालाही ही कार खरेदी करायचीये? हो हे सहज शक्य आहे तेसुद्धा अवघ्या 3 लाख रुपयांत.
Maruti Brezza ची नेमकी किंमत किती?
Maruti Brezza च्या सबकॉम्पॅट एसयुव्हीची किंमत 8.19 लाख रुपयांपासून 14.04 लाख रुपये इतकी आहे. LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या चार ट्रीम्समध्ये ही उपलब्ध आहे. सहा मोनोटोन आणि तीन ड्युअल टोनमध्ये मारुती या कारला सर्वांसमोर आणताना दिसते. 328 लीटर इतका बूट स्पेस असणाऱ्या या कारच्या खरेदीसाठीचं EMI गणितही तितकंच सोपं.
Brezza LXI व्हेरिएंटची ऑन रोड किंमत 9.26 लाख रुपये इतकी आहे. तुम्ही ही कार खरेदी करत असाल, तर स्वत:च्या निर्णयानं डाऊन पेमेंट जास्तही देऊ शकता. इथं तुम्हाला विविध बँका विविध व्याजदरानं कर्जही देतील जे तुम्ही 1 ते 7 वर्षांच्या कालावधीसाठी निवडू शकता.
हेसुद्धा वाचा : Maruti Alto CNG: 31 चं मायलेज अन् 40 हजारांची सूट! केवळ 6613 च्या EMI वर व्हा Maruti च्या या कारचे मालक
उदाहरणासह समजून घ्या, 3 लाख रुपयांचं डाऊन पेमेंट, 10 टक्के व्याज दर आणि 5 वर्षांचा कालावधी. अशा परिस्थितीत तुम्हाला 13,313 रुपयांचा EMI भरावा लागू शकतो. 6.26 रुपयांच्या कर्जासाठी तुम्ही 1.72 लाख रुपये जास्त देणं अपेक्षित असेल. त्यामुळं ही कार तुम्ही थोडी आर्थिक जुळवाजुळव केली तर घरी आणणंअगदी सहज शक्य होईल.