Maruti Suzuki च्या `या` गाड्यांना सर्वाधिक मागणी, जबरदस्त फीचर्स आणि किंमत 3.4 लाखापासून होते सुरु
मारुति सुझुकीच्या गाड्यांना भारतात सर्वाधिक पसंती मिळते. बजेट कार आणि देशभरातील सर्व्हिस स्टेशनमुळे लोकं या गाड्या विकत घेतात. ऑक्टोबर 2022 मध्येही मारुति सुझुकी कंपनी कार विक्रीच्या आकडेवारीत आघाडीवर आहे. टॉप 10 गाड्यांच्या यादीत मारुति सुझुकीच्या 7 गाड्यांचा समावेश आहे.
Maruti Suzuki Best Selling Car: मारुति सुझुकीच्या गाड्यांना भारतात सर्वाधिक पसंती मिळते. बजेट कार आणि देशभरातील सर्व्हिस स्टेशनमुळे लोकं या गाड्या विकत घेतात. ऑक्टोबर 2022 मध्येही मारुति सुझुकी कंपनी कार विक्रीच्या आकडेवारीत आघाडीवर आहे. टॉप 10 गाड्यांच्या यादीत मारुति सुझुकीच्या 7 गाड्यांचा समावेश आहे. सर्वात जास्त विक्री कंपनीच्या हॅचबॅक कारची झाली आहे. सर्वाधिक विक्री झालेल्या पाच गाड्यांची यादी पाहिली तर यात 4 हॅचबॅक कार आहेत. जर तुम्ही नवीन गाडी विकत घेण्याचा विचारात असाल, तर या तीन गाड्या आघाडीवर आहे. या तीन गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे.
मारुति सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto)- अल्टो गाडी Alto 800 आणि Alto K10 दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. नुकतंच कंपनीने अल्टो K10 गाडी अपडेट केली आहे. मागच्या महिन्यात कंपनीने 21,260 यूनिट्सची विक्री केली आहे. अल्टोची किंमत 3.40 लाखांपासून सुरु होते. या कारच्या टॉप व्हेरियंटमध्ये अँड्रॉईड आणि अप्पल कारप्लेसह 7 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री आणि फ्रंट पॉवर विंडोसारखे फीचर्स दिले आहेत.
मारुति सुझुकी वॅगन आर (Maruti Suzuki Wagon R)- ही कंपनीची सर्वाधिक मागणी असलेली कार आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये मारुति सुझुकीचे दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री झालेली कार आहे. मागच्या महिन्यात 17,945 युनिट्सची विक्री झाली आहे. या कारमध्ये 7 इंच टचस्क्रिन डिस्प्ले, चार स्पीकर असलेला म्युझिक सिस्टम, स्टियरिंग माउंटेड ऑडिओ, फोन कंट्रोल आणि 14 इंचाचा अलॉय व्हील दिला आहे.
Kia Carens करते मारुति अर्टिगा आणि एक्सएल6 स्पर्धा, जाणून किंमत आणि फीचर्स
मारुति सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift)- कंपनीची ऑक्टोबर 2022 मध्ये तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कंपनीने मागच्या महिन्यात 17,231 युनिट्सची विक्री केली होती. या गाडीची किंमत 5.92 लाखांपासून सुरु होते. स्विफ्टमध्ये 7 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम, हाइट अॅडजेस्टेबल ड्रायव्हर सीट, क्रूझ कंट्रोल, ऑटो एसी आणि एलईडी डीआरएलसह एलईडी हेडलाइट्स दिले आहेत.