Kia Carens करते मारुति अर्टिगा आणि एक्सएल6 स्पर्धा, जाणून किंमत आणि फीचर्स

Kia Carens: भारतात किया कॅरेन्स ही गाडी मारुती Ertiga आणि XL6 सारख्या MPV शी स्पर्धा करते. यासोबतच टोयोटा इनोव्हा क्रिस्टाच्या काही व्हेरियंटशीही तुलना होते. किया कॅरेन्सबद्दल सर्वकाही जाणून घ्या

Nov 11, 2022, 20:22 PM IST
1/5

Kia Carens, kia carens 7 seater

किया कॅरेन्सची किंमत 50,000 रुपयांनी वाढवण्यात आली होती. त्यामुळे गाडीची किंमत 10 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 18 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. हे प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस या पाच प्रकारात उपलब्ध आहे.

2/5

Kia Carens, kia carens 7 seater

किया कॅरेन्स 6 सीटर आणि 7 सीटर कॉन्फिगरेशनमध्ये येते. 6 सीटरचा पर्याय फक्त टॉप मॉडेल म्हणजेच लक्झरी प्लस व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. बाकी, सर्व 7 सीटर कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहेत.

3/5

Kia Carens, kia carens 7 seater

किया कॅरेन्सला तीन इंजिन पर्याय आहेत. 1.5 लिटर पेट्रोल (115PS/114Nm), 1.4 लिटर टर्बो पेट्रोल (140PS/242Nm) आणि 1.5 लिटर डिझेल (115PS/250Nm). यात 6-स्पीड मॅन्युअल, 7-स्पीड डीसीटी आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक असे ट्रान्समिशन पर्याय आहेत.

4/5

Kia Carens, kia carens 7 seater

किया कॅरेन्समध्ये कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटी, क्रूझ कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 64 कलर अॅम्बियंट लाइटिंग आणि सिंगल पेन सनरूफ यांसारखे फीचर्स आहेत.

5/5

Kia Carens, kia carens 7 seater

सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यात सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.