Maruti Suzuki 5-door Jimny Price and Features: भारतीय ग्राहकांमध्ये एसयूव्ही कारची प्रचंड क्रेझ आहे. एकापेक्षा एक अशा सरस गाड्या भारतीय बाजारात आहे. पण महिंद्रा थार आणि फोर्सच्या गुरखा गाडीची वेगळी ओळख आहे. असं असताना आता मारुती सुझुकीही या सेगमेंटमध्ये उतरणार आहे. मारुती सुझुकीच्या एसयूव्हीबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कंपनी भारतात त्याचे 5-डोर व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. नुकतीच ही एसयूव्ही भारतात चाचणी दरम्यान दिसली आहे. 5 डोअर जिम्नी आपल्या देशात 'जिप्सी' नेमप्लेट देखील परत आणू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कशी असेल 5-Door Jimny


लीक झालेल्या फोटोंमधून, गाडीची लांबी आणि मागील दरवाजा पाहू शकतो. टेलगेट-माउंट केलेले स्पेअर व्हील, चंकी अलॉय व्हील, समोरच्या विंडोलाइनमध्ये एक किंक आणि बंपर-माउंट केलेले एलईडी टेललाइट्स पाहता येतील. असं असलं तरी आतील तपशील समोर आलेले नाहीत. राईट हँड ड्राईव्ह मॉडेल खास भारतासाठी बनवली असल्याची सूचित करते. आत्तापर्यंत, भारतातील थ्री-डोअर जिमनीची सर्व युनिट्स निर्यातीसाठी बनविली आहेत आणि लेफ्ट हँड ड्राइव्ह मॉडेल आहे.


इंजिन आणि किंमत


कंपनी ही कार ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर करू शकते आणि तिची किंमत 10 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होऊ शकते. एसयूव्हीमध्ये नऊ-इंच टचस्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा, सहा एअरबॅग्ज आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण यांसारखी फीचर्स मिळतील. मारुती 5-Door जिम्नीला 1.5-लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन (103PS/137Nm) मिळण्याची आशा आहे. ग्रँड विटारा आणि एर्टिगा सारख्या माइल्ड-हायब्रिड तंत्रज्ञानाला समर्थन देईल. मारुती याला 4 व्हील ड्राईव्ह ट्रेन (4WD) देखील देईल. याशिवाय, 140PS, 1.4-लिटर, बूस्टरजेट टर्बो-पेट्रोल इंजिन देखील एसयूव्हीमध्ये अशू शकते.