Maruti Alto CNG: भारत सरकार 1 एप्रिलपासून वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनासंदर्भातील नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच अनेक वाहननिर्मिती कंपन्या आपल्या काही गाड्यांचं उत्पादन बंद करणार आहेत. अनेक कंपन्या पूर्वीपासूनच तयार करुन ठेवलेल्या गाड्यांचा स्टॉक क्लियर करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच यंदाच्या महिन्यात अनेक कंपन्या आपल्या गाड्यांवर भरघोस सूट देत आहेत. आता मारुती-सुझूकी कंपनीनेही (Maruti Suzuki Discount) आपल्या एका गाडीवर मोठी सूट देण्याची घोषणा केली आहे. मारुतीने ज्या गाडीवर मोठा सूट दिली आहे तिचं नाव आहे मारुती अल्टो 800. या गाडीचं उत्पादन 31 मार्च रोजी बंद करण्यात येणार आहे.


एकूण 40 हजारांचा फायदा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता ही कार खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल तर तुम्हाला थेट 40 हजार रुपयांचा फायदा होणार आहे. कारवालाने दिलेल्या रिपोर्टनुसार मारुती अल्टो 800 वर 20 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट दिला जात आहे. तसेच 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांचा कॉर्परेट बोनसही मिळणार आहे. त्यामुळेच या तिन्ही गोष्टींचा विचार केल्यास 40 हजार रुपयांची सूट ग्राहकांना मिळणार आहे.


EMI चा हफ्ता किती?


मारुती अल्टो 800 ही गाडी पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 796 सीसीचं मॅन्युएल ट्रान्समिशन इंजिन आहे. या गाडीची किंमत 3.97 लाख रुपये (एक्स-शोरुम) इतकी आहे. ही गाडी 5 वर्षांच्या ईएमआयवर घेतली तर दर महिन्याला 6613 रुपयांचा हफ्ता द्यावा लागेल.


भन्नाट मायलेज...


मारुती अल्टो 800 ही प्राथमिक स्तरावरील म्हणजेच ऑटोमोबाईल क्षेत्राच्या भाषेत सांगायचं झाल्यास एन्ट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे. मायलेजबद्दल सांगायचे झाल्यास गाडीचं पेट्रोल व्हर्जन 22.05 किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. तर सीएनजी व्हर्जन 31.59 किमी प्रति किलो इतकं मायलेज देते.