मुंबई: मारुति सुझुकीने भारतीय बाजारात काही महिन्यांपूर्वी प्रीमियम हॅचबॅक 2022 बलेनो गाडी लाँच केली आहे. या गाडीची सुरुवातीची एक्सशोरुम किंमत 6.49 लाख रुपये इतकी असून टॉप मॉडेलची किंमत 9.71 लाख रुपयांपर्यंत जाते. या नविन बलेनो गाडीत कंपनीने अनेत फीचर्स दिले आहेत. त्यामुळे कारप्रेमींमध्ये या गाडीबाबत प्रचंड उत्सुकता आहे. तसेच कंपनीने गाडीच्या केबिन आणि एक्सटीरियरमध्ये काही बदल केल्याने गाडी आकर्षक दिसते. त्यामुळे कारप्रेमी ही गाडी आपल्या दारात आणण्यासाठी उत्सुक आहेत. गाडी कशी घ्यावी असा प्रश्न काही ग्राहकांना पडला आहे. ही गाडी खरेदी करण्यासाठी किती खर्च येईल? हे तुम्हाला सांगणार आहोत. या गाडीसाठी किती डाउन पेमेंट भरावं लागेल आणि महिन्याला कितीचा ईएमआय पडेल? याबाबत जाणून घेऊयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किती रुपयांचा ईएमआय?
प्रीमियम हॅचबॅक सर्व करांसह ऑनरोड 7.35 लाख ते 10.88 लाखांपर्यंत जाते. कंपनीचं सिग्मा व्हेरियंट 7,34,560 रुपयांपर्यंत जाते. यासाठी ग्राहकांना 70 हजार रुपयांचं डाउन पेमेंट करावं लागेल. या डाउन पेमेंटसह पाच वर्षांसाठी 9.8 टक्के व्याज दर आहे. या गाडीसाठी प्रत्येक महिन्याला 14,055 रुपये भरावे लागतील. 


लग्झरी फीचर्स
2022 मारुति सुझुकी बलेनोमध्ये कंपनीने हायटेक फीचर्स दिले आहे. यात हेड्स-अप डिस्प्ले, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, 9 इंच स्मार्टप्ले, प्रो प्लस सिस्टमसह आर्किमीज ट्यूनिंग दिलं आहे. त्याचबरोबर नव्या पिढीचं सुझुकी कनेक्ट अ‍ॅप आहे. यात 40 हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स दिले आहे. कनेक्टेड फीचर्स इंटरनेच्या माध्यमातून चालतात आणि अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साचाही समावेश आहे. मारुति सुझुकीने नवी बलेनो सब्सक्रिप्शनवरही उपलब्ध करून दिली आहे. गाडी खरेदी न करता 13,999 रुपयांच्या मासिक भाड्यावर गाडी घरी नेऊ शकता.


मारुति सुझुकी 6 एअरबॅगसह 360-डिग्री कॅमेरा आणि 20 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते. सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच 360-डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. यामुळे ड्रायव्हरला खूप मदत करतो. कारच्या मागील बाजूस एसी व्हेंट देण्यात आले आहेत, यापूर्वी ही सुविधा कारमध्ये नव्हती. कंपनीने 2022 बलेनो 5 नवीन रंगांमध्ये उपलब्ध करून दिली असून कारचे केबिन खूपच आरामदायक बनवले आहे. नवीन कारला 16-इंच अलॉय व्हील आहेत.


कारसोबत 1.2-लीटर आधुनिक के-सीरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले असून पूर्वीपेक्षा खूपच चांगले आहे. आरामदायी प्रवासासाठी कारला नवीन सस्पेंशन देण्यात आले आहे. हे इंजिन सहसा 5-स्पीड मॅन्युअल आणि पर्यायाने 5-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. भारतीय बाजारपेठेत, 2022 बलेनोची थेट स्पर्धा Hyundai i20, TATA Altroz ​​आणि Honda Jazz शी आहे.