...म्हणून मारुती Zen पुन्हा होणार लॉन्च
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकी (Maruti Suzuki)ने आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येकवेळी नव्या कार लॉन्च करत असते
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकी (Maruti Suzuki)ने आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येकवेळी नव्या कार लॉन्च करत असते. काही दिवसांपूर्वीच मारुती स्विफ्टचं नवं व्हेरिएंट लॉन्च केल्यानंतर आता कंपनी हेचबॅक वॅगनआरचं इलेक्ट्रिक व्हेरिएंट लॉन्च करण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये ग्रेटर नोएडामध्ये झालेल्या ऑटो एक्सपोमध्ये मारुतीने कॉन्सेप्ट कार फ्यूचर एस (Future S)सादर केली होती. शहरातील तरुणांची आवड लक्षात घेत सादर केलेली कॉन्सेप्ट कार ही कंपनीची एसयूव्ही कार वाटत आहे.
तज्ञांच्या मते, कंपनीने ही कार विटारा ब्रिजा (Vitara Breeza) पेक्षा स्वस्तात लॉन्च केली तर ही कार खूपच प्रसिद्ध होईल. मारुती कंपनीची आवडती कार मारुती झेन (Maruti Zen) ला क्रॉसओव्हर / एसयूव्ही व्हेरिएंटमध्ये लॉन्च करु शकते. मारुती झेन कारचं नाव घेताच तुमच्या मनात नक्कीच जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील.
बेस्ट सेलिंग कारपैकी एक
मारुती कंपनीची झेन ही कार सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक कार आहे. आजही नागरिक मारुती झेन गाडीला खूपच पसंद करतात आणि याची Resale व्हॅल्यूही खूप आहे. काही वर्षांपूर्वी कंपनीने आपल्या या कारचं प्रोडक्शन बंद केलं होतं. मात्र, आता पून्हा एकदा लॉन्च करण्यात येणार आहे आणि कंपनीचा हा प्रयोग यशस्वी ठरु शकतो. कारण, 2002 साली बलेनो बंद केल्यानंतर मारुतीने प्रीमिअर हेचॅक सेग्मेंटमध्ये बलेनो (Baleno) पून्हा लॉन्च केली आहे.
अनेक नव्या प्रोडक्टवर मारुतीचं काम सुरु
फायनान्शिअल एक्सप्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मारुती कंपनी बाजारात आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अनेक प्रोडक्टवर काम करत आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये नवी कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार लॉन्च करण्याचा कंपनीचा विचार आहे. त्यातच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे की, कंपनी आपल्या आवडत्या झेन ब्रँडसोबत पुनरागमन करेल. पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी मारुतीच्या झेन गाडीला खूपच पसंत केलं होतं.