Maruti Tour H1: 34 KM चा मायलेज, किंमत 5 लाखाच्याही आत; मारुतीने लाँच केली खिशाला परवडणारी स्वस्त कार
Maruti Tour H1: मारुती सुझुकीने फ्लीट सेगमेंटमध्ये आपली नवी कार Maruti Tour H1 ला लाँच केलं आहे. कमर्शिअल सेगमेंटमध्ये आधीपासूनच अनेक कार उपलब्ध आहेत. यामध्ये WagonR वर आधारित Tour HS, Maruti Ertiga वर आधारित Tour M, Maruti Desire वर आधारित Tour S आणि Maruti Omni वर आधारित Tour V सहभागी आहेत.
Maruti Suzuki India नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी परवडणाऱ्या दरात कार लाँच करत असतं. फक्त खासगी वाहनक्षेत्र नाही तर व्यावसायिक वाहन क्षेत्रातही कंपनी सामान्यांना परवडेल अशा किंमतीत वाहनं लाँच करत असतात. त्यातच आता मारुती सुझुकीने फ्लीट सेगमेंटमध्ये आपली नवी कार Maruti Tour H1 लाँच केली आहे. व्यावसायिक वापरासाठी तयार करण्यात आलेली ही हॅचबॅक कार मुळ रुपात कंपनीची स्वस्त कार Alto K10 वर आधारित आहे. कंपनीने या कारची किंमत 4 लाख 80 हजार (Ex Showroom) ठेवली आहे.
Maruti Tour H1 ला कंपनीने पेट्रोल इंजिनसह कंपनी फिटेड CNG व्हेरियंटमध्ये सादर केलं आहे. याच्या CNG व्हेरियंटची किंमत 5 लाख 70 हजार रुपये आहे. याच्या एंट्री लेव्हल हॅचबॅकमध्ये कंपनीने मेटॅलिक सिल्की सिल्व्हर, मेटॅलिक ग्रेनाईट ग्रे आणि आर्कटिक व्हाइटमध्ये पेंट न करण्यात आलेले फ्रंट आणि रेअर बंपर देण्यात आले आहेत. ही कार Alto K10 चं टॅक्सी व्हर्जन आहे. ही कार व्यावसायिक वापरासाठी तयार करण्यात आली आहे.
फिचर्स काय?
Maruti Tour H1 ही पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या कारमध्ये पेट्रोल K सीरिज 1.0 लीटर क्षमतेच्या ड्युअल VVT इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 65 bhp ची पावर आणि 89 Nm चा टार्क जनरेट करते. तर CNG व्हेरियंटमध्ये 55.9 bhp ची पावर आणि 82.1 Nm चा टार्क जनरेट करते. याचं पेट्रोल व्हेरियंट 24.60 किमी\लीटर आणि एस-सीएनजी व्हेरियंट 34.46 किमी\किलो पर्यंतचा मायलेज देते.
फिचर्स काय आहेत?
या कारमध्ये सुरक्षेशी संबंधित फिचर्स सहभागी करण्यात आले आहेत. ड्यूअल एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन यासह एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, स्पीड लिमिटिंग सिस्टम आणि रिव्हर्स पार्किंग सेंसर्स असे फिचर्स या कारमध्ये आहेत. कारमध्ये प्री टेंशनर आणि फोर्स लिमिटरसह फ्रंट सीटबेल्ट, मागील आणि पुढील अशा दोन्ही प्रवाशांसाठी सीट बेल्ट रिमांइडर आणि एक इंजिन इम्मोबिलायजर देण्यात आलं आहे.
फ्लीट सेगमेंटमध्ये असणारे अन्य पर्याय
मारुती सुझुकीची कमर्शिअल सेगमेंटमध्ये अन्य इतर गाड्याही उपलब्ध आहेत. यामध्ये WagonR वर आधारित Tour HS, Maruti Ertiga वर आधारित Tour M, Maruti Desire वर आधारित Tour S आणि Maruti Omni वर आधारित Tour V सहभागी आहेत. खासगी वाहनांच्या तुलनेत ही किंमत जास्त आहे. कारण व्यावसायिक वापरासाठी या कार तयार करण्यात आल्या आहेत. या गाड्यांचा वापर टॅक्सी, वाहतूक यासाठी केला जातो.