मुंबई : फेसबुकनं स्लो इंटरनेट स्पीडवर उपाय म्हणून मॅसेंजरचं 'लाईट' वर्जन भारतात लॉन्च केलंय. हे वर्जन इतर देशांत गेल्या वर्षीच लॉन्च करण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या ग्राहकांकडे साधे स्मार्टफोन किंवा स्लो इंटरनेट कनेक्शन आहे अशा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फेसबुकनं हा उपाय शोधून काढलाय. 'लाईट' असल्यानं कमी बँडविथमध्येही हे अॅप्लिकेशन सहज वापरता येईल.


मॅसेंजर लाईट केवळ १० एमबी आहे... आत्तापर्यंत तुम्ही जे मॅसेंजर अॅप वापरत आहात ते १५१ एमबीचं आहे. 


उल्लेखनीय म्हणजे, हे नवीन अॅप अँन्ड्रॉईड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. आयफोन युझर्सना मात्र ते वापरता येणार नाही. 


मॅसेंजर लाईट अॅपमध्ये व्हॉईस कॉलिंगची सेवाही उपलब्ध आहे. जास्तीत जास्त वापरात येणारं हे अॅप तुमच्या डाटाची मात्र बचत करण्यासाठी उपयोगी ठरेल.