MG Motors ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारपेठेत आपली इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. ही कार अधिकृतपणे लाँच करताना कंपनीने फक्त आपल्या बेस व्हेरियंटच्या किंमतीची घोषणा केली होती. पण आता मात्र कंपनीने आपल्या सर्व व्हेरियंट्सच्या किंमती जाहीर केल्या आहेत. ही कार एकूण तीन व्हेरिंयंटमध्ये उपलब्ध असून बेस व्हेरियंटची किंमत 7 लाख 98 हजार इतकी आहे. तर टॉप मॉडलची किंमत 9 लाख 98 हजार (एक्स शोरुम) ठेवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MG Comet EV ला ब्रँडची पालक कंपनी SAIC च्या GSEV प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलं आहे. कंपनीने ही कार वेगवेगळ्या रंगात आणली आहे. रोजच्या प्रवासासाठी ही कार फायद्याची असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, आकाराबद्दल बोलायचं गेल्यास आपली स्पर्धक कंपनी Tiago EV पेक्षा ती छोटी आहे. कंपनी 15 मेपासून या कारच्या टेस्ट ड्राइव्हला सुरुवात करत आहे. 


MG Comet EV चे व्हेरियंट्स आणि किंमत - 


MG Coment Pace ची किंमत 7 लाख 98 हजार किंमत ठेवण्यात आली आहे. तर MG Comet Play साठी 9 लाख 28 हजार मोजावे लागणार असून MG Comet Plush ची किंमत 9 लाख 9 हजार आहे.


या कारचा लूक फारच आकर्षक आहे. कार छोटी असली तरी त्यामध्ये अनेक फिचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये LED हेडलँप, LED टेललाइट्स, डे टाइम रनिंग लाइट्स, दरवाज्यांना क्रो हँडल आणि 12 इंचाचा स्टील व्हील देण्यात आला आहे. यामुळे कारचं साइड प्रोफाइल फारच चांगलं दिसत आहे. 


MG Comet EV च्या इंटिरिअरबद्दल बोलायचं गेल्यास, त्यात 10.25 इंचाचा टचस्क्रीन इंफोमेंट सिस्टम देण्यात आला आहे. ही सिस्टम वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कार प्लेला सपोर्ट करतं. स्टिअरिंग व्हिलला कंट्रोल बटण देण्यात आले आहेत. हे डिझाइन iPad पासून प्रेरित आहे. 


सिंगल चार्जमध्ये 230 किमी


या कारमध्ये 17.3kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याची इलेक्ट्रिक मोटर 41bhp ची पावर आणि 110Nm चा टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये 230 किमीचा प्रवास करेल असा कंपनीचा दावा आहे. 3.3kW च्या चार्जरने बॅटरी चार्ज करण्यास जवळपास 7 तास लागतात. तर 5 तासात ही बॅटरी 80 टक्के चार्ज होते. 


MG Motors ने या कारच्या चार्जिंगचा खर्च फार कमी असल्याचा दावा केला आहे. या कारच्या चार्जिंगचा संपूर्ण महिन्याचा खर्च फक्त 519 रुपये इतकाच आहे. ही किंमत 1000 किमी अंतराच्या हिशोबाने देण्यात आला आहे. याचा अर्थ तुम्ही दिवसाला 33 किमीचा प्रवास करु शकता.