मायक्रोसॉफ्टने लॉन्च केले नवीन चार लॅपटॉप ; किंमत १२ हजारांपासून सुरू
अमेरिकी मल्टीनॅशनल टेक्नोलॉजी कंपनी मायक्रोसॉफ्टने नवीन चार लॅपटॉप लॉन्च केले आहेत.
नवी दिल्ली : अमेरिकी मल्टीनॅशनल टेक्नोलॉजी कंपनी मायक्रोसॉफ्टने नवीन चार लॅपटॉप लॉन्च केले आहेत. याची खासियत म्हणजे विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन कंपनीने हा लॅपटॉप लॉन्च केला आहे. हे चारही लॅपटॉप विंडोज १० वर काम करतात. त्याचबरोबर मायक्रोसॉफ्टने १४६ देशातील अध्यापकांना Office 365 Education च्या फ्री एक्सेस करण्याची ऑफर दिली आहे. यात माइक्रोसॉफ्ट लर्निंग टूलचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे लिहिणे-वाचणे आणि समजणे सोपे होईल.
मायक्रोसॉफ्टच्या नवीन लॅपटॉपमुळे लॅपटॉप मार्केटमध्ये नवी क्रांती येऊ शकते. या लॅपटॉपमधील दोन लेनोव्हा आणि दोन जेपीने विकसित केले आहेत.
१० तासांची बॅटरी लाईफ
कंपनीने Lenovo 100e हा लॅपटॉप इंटेल सेलिरॉन अपोलो लेक प्रोसेसर आणि 2 GB एलपीडीडीआर4 रॅम दिली आहे. यात 1366x768 पिक्सल रिज्यूलूशनचा ११.६ इंचाचा एचडी एंटीग्लेयर डिस्प्ले आहे. लॅपटॉपची बॅटरी १० तासांपर्यंत राहील, असा दावा कंपनीने केला आहे. याचे वजन १.२२ किलोग्रॅम आहे. याची किंमत १८९ डॉलर म्हणजेच सुमारे १२,००० पासून सुरू होते.
11.6 इंचाचा एचडी मल्टीटच डिस्प्ले
Lenovo 300e टू-इन-वन कनवर्टेबल पीसी हा लॅपटॉप मायक्रोसॉफ्ट एक्जुकेशन सीरीजच्या अंतर्गत लॉन्च केला आहे. यात इंटेल पेंटियम प्रोसेसर आणि 4 GB एलपीडीडीआर4 रॅम व 16 GB ईएमएमसी स्टोरेज आहे. त्याचबरोबर 1366x768 पिक्सलचा 11.6 इंचाचा एचडी मल्टीटच डिस्प्ले आहे. याची किंमत २७९ डॉलर म्हणजे सुमारे १७,८०० रुपयांपासून सुरू होते. याची बॅटरी लाईफ ८ तासांची असेल.
अजून दोन लॅपटॉप सादर केले
याव्यतिरिक्त एज्युकेशन रेंजवर अजून दोन लॅपटॉप सादर करण्यात आले आहेत. जेपीने लॉन्च केलेले हे लॅपटॉप Classmate Leap T303 ला सपोर्ट करतात. याची किंमत १९९ डॉलर म्हणजे सुमारे १२,७०० रुपयांपासून सुरू होते. Trigono V401 टू-इन-वन लॅपटॉपची किंमत २९९ डॉलर म्हणजे सुमारे १९,१०० पासून सुरू होते. यात पेन आणि टच सपोर्ट होते.