मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट 'फेसबुक'नं एक धक्कादायक कबुली दिलीय. कोट्यवधी वापरकर्त्यांचे पासवर्ड फेसबुकच्या अंतर्गत सर्व्हरवर सेव्ह करण्यात आले होते. तेदेखील टेक्स्ट स्वरूपात... म्हणजेच, फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्याला हे पासवर्ड सहजपणे पाहता येत होते, अशी कबुली फेसबुकनं दिलीय. फेसबुक कंपनीबाहेरील कुणालाही हे पासवर्ड दिसण्याची शक्यता नव्हती आणि एकाही पासवर्डचा दुरुपयोग झालेला नाही, असं स्पष्टीकरणही फेसबुकनं दिलंय. नियमित सायबर सुरक्षा तपासणीच्या वेळी हा धक्कादायक प्रकार उघड झालाय. फेसबुकनं वापरकर्त्यांसोबत केलेल्या सुरक्षा करारांचा हा भंग असल्याचा आरोप होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका ब्लॉग पोस्टद्वारे इंजिनिअरिंग, सिक्युरिटी ऍन्ड प्रायव्हसी व्ही पी पेड्रो कनाहौती यांनी याबद्दल माहिती दिलीय. 'फेसबुक'च्या कोणत्याही कर्मचाऱ्यानं या पासवर्डचा चुकीचा वापर केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. 


उल्लेखनीय म्हणजे, 'फेसबुक'वर याआधीही युझर्सचा डाटा असुरक्षित टेवण्याचे आणि हा डाटा इतरांशी शेअर करण्याचे आरोप होत आलेत.