नई दिल्ली : I&B Ministry blocks 18 Indian YouTube channels:  खोट्या बातम्या आणि भारतविरोधी मजकूर पोस्ट केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I&B मंत्रालय) 18 भारतीय आणि चार पाकिस्तान पुरस्कृत YouTube न्यूज चॅनेल ब्लॉक केले आहेत. मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले की, या YouTube चॅनेलने दर्शकांची दिशाभूल तसेच भारताविरोधी कन्टेन्ट पोस्ट केला आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.


फेक कन्टेन्ट पोस्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रालयाने म्हटले की, यूट्यूब चॅनेलचा वापर भारताविरोधी कन्टेन्ट पोस्ट करण्यासाठी करण्यात येत होता. भारतीय सशस्त्र सेना, जम्मू आणि काश्मीर यांसारख्या विषयांवर पाकिस्तान पुरस्कृत चॅनेल भारताविरोधी खोट्या बातम्या पसरवत होते. त्यामुळे अशा चॅनेलने सरकारवर कारवाई केली आहे.


अधिसूचनेत म्हटले की, "भारताच्या विरोधात कन्टेन्ट प्रसिद्ध करणाऱ्या फेक तसेच खोट्या बातम्या पसरवणाऱ्या चॅनेलमुळे भाराताचे इतर देशांसोबच्या संबधांना हानी पोहचू शकते." सरकारने ब्लॉक यूट्यूब चॅनेलची एकूण दर्शकांची संख्या 260 कोटींहून अधिक होती.


डिसेंबरपासून आतापर्यंत मंत्रालयाने 78 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. याशिवाय अनेक सोशल मीडिया अकाऊंट्स आहेत, ज्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ही खाती चुकीची माहिती पसरवत होती.