मुंबई : Mobile bill will increase : नव्या वर्षात पुन्हा मोबाईलवर बोलणं महागणार आहे. टेलिकॉम कंपन्या पुन्हा टॅरिफ वाढविणार असल्याचे संकेत दिले आहेत.1 डिसेंबरला जियो, एयरटेल आणि वोडाफोनने टॅरिफमध्ये 20 ते 25 टक्क्यांची वाढ केली आहे. (Talking on mobile again in the new year will be expensive, but BSNL is an exception)


पुन्हा प्री-पेड, पोस्टपेट बील वाढणार  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या वर्षात टेलिकॉम कंपन्या पुन्हा टॅरिफ वाढविणार आहेत. टेलिकॉम इंडस्ट्रीमधील तिन्ही बड्या कंपन्यांनी 1 डिसेंबर 2021 पासून आपल्या प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली होती. यावर्षी 20-25 टक्के वाढ करूनही आजपासून यावर्षी मोबाईलवर बोलणे महागणार आहे. यामागे भारतात येणारं 5G नेटवर्क कारण असू शकते, असे कारण देण्यात आले आहे.


बीएसएनएलचा धमाका


भारत सरकारची टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL अशी एकमेव टेलिकॉम कंपनी आहे. जिने आपल्या प्रीपेड प्लानच्या किंमतीत वाढ केलेली नाही. बाकी सर्व खासगी टेलिकॉम ऑपरेटर्सने आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. सरकारी टेलिकॉम आणि खासगी टेलिकॉमच्या प्रीपेड प्लानच्या किंमतीत खूप मोठा फरक आहे.


बीएसएनएलने जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाची सुट्टी करणारा 187  रुपयाचा प्लान सादर केला आहे. या प्लानमध्ये 28 दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये यूजर्संना डेली 2 जीबी डेटा दिला जातो.  यासोबतच यूजर्संना डेली 100  एसएमएस आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा दिली आहे.