मुंबई: जगभरात कोरोनानं हाहाकार माजला आहे. एकीकडे बेरोजगारी वाढली तर दुसरीकडे घरबसल्या ऑनलाइन ट्रान्झाक्शन करण्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यामुळे हॅकिंगचं प्रमाण वाढलं. गेल्या काही दिवसांत हॅकर्सनी नवीन युक्त्या शोधून काढल्या आहेत. आता मालवेअर किंवा जोकर नाही तर फक्त एका SMS द्वारे तुमचं बँक खातं हॅक करण्याची टेकनिक हॅकर्सनी शोधली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरटेल कंपनीचे सीईओ गोपाल विठ्ठल यांनी नुकतंच एअरटेलच्या ग्राहकांना याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. हॅकर्स तुमच्या फोनवर एक मेसेज पाठवून अगदी सहज तुमच्या खात्याचे डिटेल्स मिळवू शकतात आणि तुमचं अकाऊंड रिकामं होऊ शकतं असंही यावेळी त्यांनी सांगितलं. त्यामुळे ग्राहकांना सावध राहायला हवं. शक्यतो आपली कोणतीही माहिती फोनवर देऊ नका असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.


हॅकर्स कसे तुमच्या खात्याचा ताबा मिळवतात, शोधली नवी टेकनिक


यूझर्सला KYC व्हेरिफिकेशनचा एक मेसेज येतो. याच मेसेजवर अनेक ग्राहक फसतात. तुम्ही जर हे व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुमच्या सीमची सेवा पुढच्या 24 तासांत बंद करण्यात येईल असं सांगण्यात येतं. हा एक मोठा घोटाळा आहे आणि त्याद्वारे पैसे लुटण्याचं षडयंत्र असल्याचं सांगण्यात आलं आहे. ट्वीटरवरही अनेक लोकांनी या फ्रॉड मेसेजबाबत माहिती दिली आहे. 


तुम्ही जर त्या लिंकवर क्लीक केली किंवा त्याला रिप्लाय दिला तर तुम्हाला  एक ओटीपी पाठवला जातो. तो ओटीपी तुम्ही दुसरं तिसरं कोणी नाही तर हॅकर्सला देत असता आणि याची तुम्हाला पुसटशी कल्पनाही नसते. या ओटीपीच्या मदतीनं तो तुमचं बँक अकाऊंट दोन सेकंदात रिकामं करू शकतो. 


या नंबरवरून ग्राहकांना येतात मेसेज


9114204378  या क्रमांकावरून एक मेसेज येतो. जर हा मेसेज तुम्हाला आला असेल तर तुम्ही तातडीनं 8582845285 या नंबरवर तातडीनं फोन करायला हवा. तुम्ही जर अशा फोन किंवा SMSला रिप्लाय दिला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपली कोणतीही माहिती अशा SMS वर किंवा कोणालाही फोनवर देऊ नका असं आवाहन करण्यात आलं आहे.