मुंबई : आज आपण जितके आपल्या कुटुंबावर अवलंबून आहोत तितकेच आज आपण आपल्या स्मार्टफोनवर देखील अवलंबून आहोत. आपल्याला कोणते ही काम करायचे असले तरी आपण ते स्मार्टफोनवर करतो. कामापासून ते मनोरंजनापर्यंत आणि मित्रांपासून नातेवाईकांपर्यंत, आपले संपूर्ण जग आपल्या स्मार्टफोनपर्यंत मर्यादित आहे. एवढच काय तर आता आपण पैशांचा व्यवहार देखील स्मार्ट फोनवरती करतो. अशा परिस्थितीत, स्मार्टफोनची सुरक्षा आणि त्याशी संबंधित गोपनीयता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यासाठी फोन लॉक केला जाऊ शकतो, असे वैशिष्ट्य आजकालच्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये आहे, परंतु स्मार्टफोनच्या आत असलेले अ‍ॅप्स लॉक करण्यासाठी, सहसा थर्ड पार्टी अ‍ॅप्स डाउनलोड करणे आवश्यक असते. त्याशिवाय तुम्ही अ‍ॅप्सला लॉक लाऊ शकत नाही, परंतु असे थर्डपार्टी अ‍ॅपस हे कधीही सुरक्षित नसतात.


परंतु तुम्ही जर सॅमसंग वापरकर्ते असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे, कारण तुम्हाला लॉकसाठी कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार नाही आणि तुम्ही तुमच्या फोनचे अ‍ॅप्स पासवर्डने सुरक्षित करू शकता. परंतु हे कसं शक्य आहे? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


अ‍ॅप्स लॉक करण्यासाठी सॅमसंगला कोणत्याही तिसऱ्या अ‍ॅपची गरज नाही


सॅमसंग अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम यूजर्स सॅमसंगकडे स्वतःची कस्टम One UI स्किन आहे, ज्याद्वारे कंपनीकडून स्वतःचे बदल आणि थीम इत्यादी डिव्हाइसवर लागू केले जाते. यामध्ये, सॅमसंग वापरकर्त्यांना अ‍ॅप लॉक करण्याची सुविधा देखील मिळते आणि त्यामुळे वापरकर्त्याला कोणतेही तिसरे अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज भासत नाही.


सॅमसंगचे S Secure App
सॅमसंगचा स्वतःचा इंटेरफेस One UI अॅप लॉकिंगसाठी देखील सुविधा देतो. सॅमसंगच्या एस सिक्युर अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमचा संपूर्ण फोनच नाही, तर कोणताही अ‍ॅप पासवर्ड लावून लॉक करू शकता.


हे कसे वापरावे
लक्षात ठेवा की, हे अ‍ॅप सॅमसंगचे आहे, म्हणून ते आपल्या फोनवर डाउनलोड करण्यासाठी, आपल्याला सॅमसंग अ‍ॅप स्टोअरमध्ये जावे लागेल, गूगल प्ले स्टोअरवर तो तुम्हाला मिळणार नाही. Samsung App Store वर जा आणि तुमच्या फोनवर S Secure अ‍ॅप डाउनलोड करा, नंतर तुमच्या फोनच्या सेटिंग्जवर जा.


सेटिंग्जमध्ये आपला सॅमसंग स्मार्टफोन शोधा, त्यानंतर 'अ‍ॅडव्हान्स फीचर' पर्यायावर क्लिक करा. 'लॉक आणि मास्क अ‍ॅप्स' हा पर्याय शोधा, 'लॉक' पर्यायावर टॉगल करा आणि नंतर तुम्हाला लागू करायचा असलेला लॉकचा प्रकार निवडा (पिन, पासवर्ड, पॅटर्न इ.). हे केल्यानंतर, तुम्हाला 'अ‍ॅप लॉक टाइप', 'लॉक केलेले अ‍ॅप्स' आणि 'मास्क केलेले अॅप्स' असे तीन पर्याय दिसतील. त्यापैकी 'लॉक अ‍ॅप्स' वर क्लिक करा, तुम्हाला लॉक करायचे असलेले अ‍ॅप्स निवडा आणि नंतर 'डन' वर क्लिक करा.


अशा प्रकारे, आपल्या पसंतीचे सर्व अ‍ॅप्स आता कोणतेही थर्ड पार्टीशिवाय डाउनलोड करा आणि आपल्या फोनची सुरक्षा देखील करा.