Most Common Password In India: पासवर्डमुळं तुमचा फोन, टॅब, लॅपटॉपसह अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुरक्षित राहतात. पासवर्ड ठेवल्यास तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणी तुमचे दस्तवेज पाहू शकणार नाही. तसंच, तुमचा फोन वापरु शकणार नाही. पण अनेकांना पासवर्ड लक्षात ठेवणे खूप कठिण जाते. त्यामुळं ते लगेचच लक्षात राहिल असा सोपा पासवर्ड ठेवतात. पण आत्ताच्या काळात असा पासवर्ड ठेवणे कधीकधी नुकसानदायक ठरु शकतं. NordPass संस्थेने भारतातील लोक सर्वात जास्त कोणता पासवर्ड ठेवतात याचा खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार, भारतीय अजूनही खूप सोप्पे व खूपच सामान्य असणाऱ्या पासवर्डचा वापर करतात. 


सगळ्यात जास्त वापरले जातात हे पासवर्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

123456
admin
12345678
12345
password
Pass@123
123456789
Admin@123
India@123
admin@123
Pass@1234
1234567890
Abcd@1234
Welcome@123
Abcd@123
admin123
administrator
Password@123
Password
UNKNOWN


सगळ्यात कॉमन पासवर्ड


NordPass संस्थेने एक सर्वेक्षण केले होते त्यातील काही माहिती पोस्ट करण्यात आली आहे. NordPassच्या मते युजर्स त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सगळ्यात कमजोर पासवर्डचा वापर करतात. भारतीय जास्त करुन त्यांच्या पासवर्डमध्ये India या शब्दाचा वापर करतात. सगळ्यात कॉमन पासवर्ड हा India@1234 हा आहे. 


हॅकर्सचा धोका


एका रिपोर्टनुसार, पासवर्ड वास्तवात इतके सुरक्षित नसतात. रिपोर्टच्या नुसार,  NordPassच्या पासवर्ड डेटाबेसमध्ये सापडलेल्या पासवर्डना एका सेकंदापेक्षा कमी अवधीत क्रॅक केला जाऊ शकतं. म्हणजेच हॅकर अगदी आरामात तुमचं ब्राउजर हॅक करु शकतं. त्यामुळं तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. 


पासवर्ड ठेवा सुरक्षित 


तुम्हाला तुमचा पासवर्ड सुरक्षित ठेवायचा असेल तर अधिक वेगळ्या पद्धतीने पासवर्ड सेव्ह करायची गरज आहे. याचा एक उत्तम पर्याय म्हणजे पासवर्ड मॅनेजर हा आहे. पासवर्ड मॅनेजर तुमच्या सर्व पासवर्डला सुरक्षित ठिकाणी सेव्ह करतो आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत एन्क्रिप्शनचा वापर करतो.