मुंबई  : मोटोरोला कंपनीचा 'मोटो ई४ प्लस' भारतात लॉन्च झालाय. फ्लिपकार्टवर आज रात्रीपासून हा स्मार्टफोन ग्राहकांना विकत घेता येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये असणारी ५००० mAH बॅटरी... या बॅटरीमुळे एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल दोन दिवस यूझर्सना हा फोन वापरता येईल.


मेटल बॉडी डिझाईन असणाऱ्या या स्मार्टफोनच्या होम बटनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेलाय. यामध्य ५.५ इंचाचा एचडी डिस्प्ले उपलब्ध आहे. क्वाडकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४२७ प्रोसेसरवर हा स्मार्टफोन चालतो. तसंच यामध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोअरेज उपलब्ध आहे. १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा यात दिला गेलाय. डिव्हाईस अँन्ड्रॉईड ७.१.१ नूगा वर चालेल. 


तसंच या स्मार्टफोनमध्ये वॉटर रेपलेंट कोटिंग दिली गेलीय. त्यामुळे पाण्यापासून या स्मार्टफोन सुरक्षित राहतो. या स्मार्टफोनची किंमत ९९९९ रुपये इतकी निर्धारित करण्यात आलीय.